Video: कल्याणमध्ये 1 वर्षाच्या चिमुकल्यावरून मावशी-आजोबांमध्ये भररस्त्यात 'राडा'; आजोबांनी मावशीला घेतले चावे

Kalyan News : कल्याणमध्ये एका लहान मुलाच्या ताब्यावरून त्याची मावशी आणि आजोबांमध्ये  भर रस्त्यात जोरदार वाद आणि हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : कल्याणच्या भररस्त्यावर झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याण:

Kalyan News : कल्याणमध्ये एका लहान मुलाच्या ताब्यावरून त्याची मावशी आणि आजोबांमध्ये  भर रस्त्यात जोरदार वाद आणि हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादादरम्यान मुलाच्या आजोबाने मावशीला अनेक ठिकाणी चावा घेतल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्व येथील एक व्यक्ती जवळपास 3 महिन्यांनी तुरुंगातून (जेल) सुटल्यानंतर त्याची पत्नी, मेहुणी (मावशी), आणि भाऊ त्याची जेल बाहेर वाट पाहत होते. तुरुंगातून सुटल्यावर मुलाची आई आणि मावशी रिक्षात बसल्या, तर मुलाचे वडील आणि काका दुचाकीवर होते. त्यांच्यासोबत अवघ्या 1 वर्षाचा मुलगा होता.

वाद कशामुळे झाला?

दुचाकीवर असलेले वडील रिक्षात असलेल्या मुलाला पाहून रडत होते. हे पाहून मुलाची मावशी श्वेता नरसिंगे यांनी मुलाच्या वडिलांना (तिचे भावजी) रिक्षात येऊन बसण्याची विनंती केली. "त्याला दुचाकीवर घेऊ नका, तुम्ही रिक्षात या," असे त्या म्हणाल्या.

मावशीच्या या बोलण्यावरून मुलाचे चुलत आजोबा दलित नसरगंद यांना भयंकर राग आला. त्यांनी मावशी श्वेता नरसिंगे यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली.

Advertisement

भररस्त्यात हाणामारी आणि चावा 

दलित नसरगंद यांनी मेट्रो मॉल परिसरामध्ये श्वेता नरसिंगे यांची रिक्षा अडवली. त्यांनी रिक्षाला दुचाकी आडवी टाकली आणि श्वेता यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. धक्कादायक बाब म्हणजे, आजोबा दलित नसरगंद यांनी श्वेता यांना मारहाण केली आणि त्यांच्या हाताला तसेच इतर तीन ते चार ठिकाणी चावा घेतला.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )
 

या हल्ल्यात श्वेता नरसिंगे जखमी झाल्या आहेत. भर रस्त्यात हा 'राडा' सुरू असल्यामुळे लोकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

पोलिसांत तक्रार दाखल

जखमी श्वेता नरसिंगे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली आहे. त्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचल्या आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू केला आहे. एका वर्षाच्या चिमुकल्यावरून झालेला हा कौटुंबिक वाद कल्याणमध्ये चर्चेचा विषय बनला.

( नक्की वाचा : Akola : माजी आमदाराच्या वाढदिवसाहून परतणाऱ्या कारला भीषण अपघात; 1 ठार, शहरप्रमुखासह 5 गंभीर जखमी )
 

इथे पाहा Video

Topics mentioned in this article