Kalyan News : कल्याणमध्ये एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याणच्या एका चार वर्षाच्या चिमुरडीचा बाप चोरीच्या प्रकरणात जेलमध्ये गेला. त्यानंतर आईनं दुसरं लग्न केलं. त्यानंतर चुलत मावशी आणि तिच्या नवऱ्यानं तिला घरी नेलं. पण, तिचे हाल संपले नाहीत. या मुलीला प्रात:विधी येत नसल्यानं मावशी आणि नवऱ्यानं चिमुरडीची हत्या केली. आता तब्बल 8 महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेतील खडेगोलीवाली परिसरात राहुल घाडगे त्याची पत्नी आणि मुलीसोबत राहत होता. एक वर्षापूर्वी चोरीच्या प्रकरणात त्याला जेल झाली. राहुल घाडगे जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केलं. राहुलची चार वर्षाची चिमुकली एकटीच राहिली. तिच्या चुलत मावशी अपर्णा कांबरीनं मुलीचा सांभाळण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : तुझ्या शरीरात 4 राक्षस, 11 वेळा संभोग आवश्यक... विरारच्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला बनवले शिकार )
अपर्णा मुलीला तिच्या घरी घेऊन गेली. काही दिवसानंतर या चिमुकलीच्या आत्या ज्योती सातपुते भावाच्या मुलीला माझ्या घरी पाठवा अशी विनंती करत होती. पण, अपर्णा आणि तिचा पती प्रथमेश कांबरी सातत्यानं टाळाटाळ करत होते. त्यानंतर आत्याला संशय आला. चिमुकलीबाबत अपर्णा आणि तिचा नवरा काहीही सांगत नसल्यानं ज्योती सातपुते यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
या प्रकरणात ज्योती सातपुते यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. अपर्णा आणि प्रथमेश पोलिसांच्या प्रश्नांना उलट-सुलट उत्तरं देत होते. अखेर पोलीस तपासात सत्य समोर आलं. ते सत्य समजल्यावर पोलिसांना धक्का बसला.
( नक्की वाचा : Love Story : भयंकर! विवाहित महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं, पती सोबत विवस्त्र केलं आणि स्क्रूड्रायव्हरनं... )
चिमुकलीला प्रात:विधी येत नसल्यानं अपर्णा आणि तिचा नवरा कंटाळले होते. त्यामधूनच अपर्णानं तिला मारहाण केली. या मारहाणीत चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी चिमुकलीचा मृतदेत कर्जतच्या जंगलात फेकून दिले. या प्रकरणात अर्पणा कांबरी आणि प्रथमेश कांबरी या दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.