
तुझ्या शरीरात 4 राक्षस आहेत, त्यांना शरीराबाहेर काढण्यासाठी 11 वेळा संभोग करणे आवश्यक आहे... असे सांगून एका नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकार बनवले आणि एकाच दिवशी तिच्यासोबत 3 वेळा संभोग केला. मुंबईजवळच्या विरारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अंध व्यक्तीने भूत-प्रेत काढण्याच्या बहाण्याने 17 वर्षांच्या विद्यार्थिनीचे एकाच दिवसात 3 वेळा शोषण केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कशी घातली भीती?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित विद्यार्थिनीला तिच्या शरीरात चार राक्षस आहेत. ते राक्षस तिच्या भावी पतीला मारू शकतात किंवा तिला बाळ होण्यापासून रोखू शकतात, अशी भीती घातली. त्याने पीडितेला ही गोष्ट कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिली आणि वाईट आत्म्यांना घालवण्यासाठी 11 वेळा संभोग करण्याची ही विधी करावी लागेल, असा आग्रह धरला.
( नक्की वाचा : Love Story : भयंकर! विवाहित महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं, पती सोबत विवस्त्र केलं आणि स्क्रूड्रायव्हरनं... )
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने यात त्याच्या मित्राचीही मदत घेतली. आरोपीने राजोडी बीचजवळ एका लॉजमध्ये खोली बुक केली. जिथे त्याने विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेचे कथितरित्या तीन वेळा लैंगिक शोषण केले. ही घटना गेल्या महिन्यात घडली होती. पीडितेने या प्रकरणी शुक्रवारी तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बीएनएसच्या कलम 137(2), 64 आणि 64(2) तसेच पॉक्सो कायदा आणि महाराष्ट्र मानवी बळी आणि इतर अमानुष, अनैतिक आणि अपवित्र आचरण आणि जादूटोणा कायदा, 2013 च्या कलम 1 आणि 49 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनी मुंबईजवळील विरार येथे तिच्या पालकांसोबत राहते आणि 11 वीत शिकते. तिला मानसिक आजार असल्याचे सांगितले जाते. गेल्या चार वर्षांपासून तिच्यावर भुताची सावली असल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. पीडितेला तिच्या एका मैत्रिणीने आरोपीशी ओळख करून दिली होती.
( नक्की वाचा : घरी बसणाऱ्या नवऱ्याला जाब विचारणे जीवावर बेतले! सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील महिलेचा टोकाचा निर्णय )
कधी झाली ओळख?
जुलैमध्ये पीडितेची पहिल्यांदा आरोपीशी भेट झाली. आरोपीने पीडितेला सांगितले की ही विधी करण्यासाठी 11 वेळा संभोग करणे आवश्यक आहे. सुरुवातीला तिने नकार दिला, पण तिच्या भविष्याची भीती वाटल्याने ती तयार झाली आणि 30 जुलै रोजी ती आरोपीला भेटली.
या घटनेनंतर पीडितेने तिच्या एका मैत्रिणीला याबद्दल सांगितले. मैत्रिणीने तिला हा एक फसवणूक अ कुटुंबाला सांगण्यास सांगितले. मैत्रिणीने पीडितेच्या पालकांशीही बोलले, त्यानंतर तिचे वडील शुक्रवारी विरार पोलीस स्टेशनला पोहोचले, जिथे पीडितेने तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी इतर महिलांनाही अशाच प्रकारे "काळ्या जादूच्या" बहाण्याने शिकार बनवले आहे का, याचा तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world