अमजद खान
कल्याणच्या नामांकित ब्यूटीपार्लरमध्ये शिकणाऱ्या एका मुलीची ब्यूटीपार्लरची अंतिम परिक्षा होती. मॉडेल सोबत मेकअप करुन रिल तयार करायचे होते. या रिलसाठी मुलीने घरच्यांना अंधारात ठेवून 9 तोळ्याचा महागडा सोन्याचा हार पार्लरमध्ये आणला. त्यानंतर मॉडेल सोबत रिल केले. घरी गेल्यानंतर बघते तर बॅगेतील हारच्या बॉक्समधून महागडा हार गायब होता. आता या प्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलिस करीत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याणमध्ये नामांकित संजना पंडीत मेक ओवर ब्यूटी पार्लर आहे. या पार्लरमध्ये 19 तरुणी शिकत आहेत. घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगरात राहणारी प्रियंका गांगुर्डे ही तरूणी देखील याच ब्यूटी पार्लरमध्ये शिकते. प्रियंकाची शेवटचे दोन दिवस बाकी होते. तिची परिक्षा होती. तिने एक मॉडलला मुंबईहून कल्याणमध्ये आणले. ब्यूटी पार्लरमध्ये ती आली होती. तिच्या गळ्यात प्रियंकाने घरातून आणलेले महागडा हार घातला. त्यानंतर रिल तयार केला.
रिल तयार केल्यावर गळ्यात घातलेला हार काढला. नंतर हा हार बॅगेतील बॉक्समध्ये ठेवून दिला. पुढे सहकाऱ्यांच्या मदतीला लागली. त्यानंतर तिने कल्याणहून ट्रेन पकडून घरी गाठलं. घरी गेल्यावर हारच्या बॉक्स मधून महागडा हार गायब होता. तिच्या पायाखालची वाळूच सरकली. ती कल्याणला आली. तिने या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी सुरेश पाटील करीत आहे.
पोलिस म्हणाले, तिने दिलेल्या माहितीनुसार प्रियंका हिचा हार कुठे गायब झाला आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत. या प्रकरणात 18 विद्यार्थींनीची विचारपूस सुरु आहे. त्याबरोबर ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या संचालकाची चौकशी सुरु आहे. ब्यूटी पार्लरमध्ये हार बॅगेत ठेवल्यानंतर प्रियंकाने पुन्हा पाहिले नाही. ट्रेनमधून प्रवास करताना तिची बॅग कोणी उघडली नाही. तर हार नेमका गेला कुठे याचा शोध आता सुरु आहे. विशेष म्हणजे प्रियांका घरच्यांना न सांगता तो हार घेवून कल्याणला आली होती.