Kalyan News : स्मशानभूमीची आरक्षित जमीन दडपण्याचा बिल्डरचा प्रयत्न, वाचा कसा झाला पर्दाफाश?

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली ही शहरं अनधिकृत बांधकामासाठी राज्यात बदनाम आहेत. बनावट कागदपत्र सादर करत महारेराचे फसवणूक केल्याचं प्रकरण ताजे असतानाच कल्याणमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाहनतळ आणि स्मशानभूमीच्या आरक्षण असलेल्या भूखंडाचे खोटे कागदपत्र सादर करत अकृषिक दाखला मिळवण्याचा प्रकार कल्याणच्या एका बिल्डरनं केलाय. सलमान डोलारे असं या बिल्डरचं नाव आहे. या प्रकरणात सलमानवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याणमधील मासा बिल्डर ग्रुपचे  भागीदार सलमान डोलारे यांनी कल्याणमध्ये स्मशानभूमी आणि वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या एका भूखंडावर बांधकाम करण्यासाठी अकृषिक दाखला मिळवण्यासाठी कल्याण तहसील कार्यालयात या जागेचे खोटे कागदपत्र सादर केले.  खोट्या कागदपत्राच्या सहाय्याने तहसील कार्यालयाचे कर्मचाऱ्यांचे दिशाभूल करत डोलारे यांनी या जागेवर अकृषिक दाखला मिळवला.

तहसील कार्यालयानं कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरही ही कागदपत्र बनावट असल्याचं लक्षात आलं. या प्रकरणात तहसील कार्यालयाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

( नक्की वाचा : Kalyan News : जज साहेब मला मोकळे करा, आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेनं भिरकावली चप्पल )
 

या प्रकरणातील आरोपी सलमान डोलारे विरोधात यापूर्वी देखील अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नुकताच युसुफ हाईट्स या अनधिकृत इमारत प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

Advertisement

कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामासाठी खोटी कागदपत्र तयार करत शासनाचे दिशाभूल करण्याचे अनेक प्रकार या आधी देखील उघडकिस आलेत . या बांधकामांमध्ये घरे घेऊन अनेक गरजू गरीब नागरिकांची फसवणूक होत आहे .त्यामुळे या प्रकारांना शासनाने आळा घालावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. 
 

Topics mentioned in this article