Kalyan News: ड्रग्ज पार्टीचा 'मास्टरमाइंड' गजाआड! त्या आधी हायव्होल्टेज ड्रामा, पुढे तासभर जे घडले ते...

मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को (NESCO) एक्झिबिशन सेंटरमध्ये एका लेट-नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबईतील नेस्को सेंटरमधील हाय-प्रोफाईल ड्रग्ज पार्टी प्रकरणी आनंद पटेल याला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे
  • आनंद पटेलने घराचा दरवाजा आतून बंद केला होता. त्यामुळे पोलीस एक तास थांबले होते
  • आनंद पटेल हा ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रिय असून पार्टी आयोजकांना ड्रग्ज पुरवठा करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या हाय-प्रोफाईल ड्रग्ज पार्टीप्रकरणी तपासाला मोठे यश आले आहे. ड्रग्जचा मुख्य पुरवठादार आनंद पटेल याला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्तरीत्या राबवलेल्या या मोहिमेत तब्बल एक तास चाललेल्या नाट्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलीसांना मोठी कसरत करावी लागली. ड्रग्ज सप्लायर आनंद पटेल याला खडकपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा करणाऱ्या आनंदला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून उचलले, मात्र या अटकेपूर्वी मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तपास पथक कल्याणमधील 'मोहन हाईट्स' या इमारतीत पोहोचले. आनंदचे वडील लखन पटेल यांनी सुरुवातीला आपला मुलगा गावी असल्याचे सांगितले. त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी लखन यांच्यासह आठव्या मजल्यावर धाव घेतली. तिथे आनंदने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. घरात त्याचे सर्व नातेवाईक आले होते. तो दरवाजा उघडायला तयार नव्हता. जवळपास एक तास पोलीस ताटकळत बाहेर उभे होते. जो पर्यंत आनंद बाहेर येणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अशी पोलीसांची भूमीका होती. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News: लाईव्ह कॉन्सर्ट... ओव्हरडोस; तरुण- तरुणीच्या मृत्यूने मुंबईत खळबळ, 5 अटकेत

पोलीसांनी आनंदचे वडील लखन पटेल यांच्यावर दबाव टाकला. शेवटी त्यांचा ही नाईलाज झाला. अखेर वडिलांनी विनवणी केल्यानंतरच आनंदने दार उघडले. आनंद पटेल हा स्वतःला बिल्डर म्हणवून घेतो, मात्र तो ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे समोर येत आहे. त्याचे वडील लखन पटेल यांच्यावरही यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्टीतील आयोजकांना ड्रग्ज उपलब्ध करून देण्यात आनंदची महत्त्वाची भूमिका होती असा आरोप आहे.

नक्की वाचा - Ashok Kharat Case: खरातने चाकणकरांच्या बहिणीला कसं फसवलं? चौकशीत धक्कादायक माहिती उघड

आनंद पटेल हा कल्याणच्या हाय-प्रोफाईल सोसायटीत राहत असल्याची माहिती मिळताच पोलीस तिथे धडकले. पोलिसांच्या भीतीपोटी त्याने तब्बल एक तास घराचे दार उघडले नाही. तो घराबाहेर येण्यास तयार नव्हता. त्याच्या सोबत त्याचे नातावाईक ही होते. दोन दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस झाला होता. त्यामुळे हे सर्व जण घरी आले होते.  घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून लखन पटेल यांनी मुलाला विनवणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुंबईतल्या ड्रग्ज पार्टी मागे आनंदचा हात असल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप  आहे. 

नक्की वाचा - Viral News: नियतीचा क्रुर खेळ! 2 वर्षांच्या शंभुला वाचवण्यासाठी आईची धाव, दवाखान्याच्या पायरीवर जीव सोडला

मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को (NESCO) एक्झिबिशन सेंटरमध्ये एका लेट-नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात तरूणाई लोटली होती. मात्र ही तरूणाई नशेमध्ये बेधुंद होती. यातील अनेक तरुणांनी ड्रग्जचे सेवन केले होते. यात अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन उच्चशिक्षित एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वनराई पोलिसांनी कठोर पावले उचलत कार्यक्रमाचे आयोजक, नेस्कोचे कर्मचारी आणि मृतांच्या दोन मित्रांसह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी कल्याणमध्ये ही कारवाई करण्यात आली.