जाहिरात

Ashok Kharat Case: खरातने चाकणकरांच्या बहिणीला कसं फसवलं? चौकशीत धक्कादायक माहिती उघड

शिर्डीतील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. समता पतसंस्थेतील 100 बनावट खात्यांच्या व्यवहारात आता खरातची पत्नी कल्पना खरातचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

Ashok Kharat Case: खरातने चाकणकरांच्या बहिणीला कसं फसवलं? चौकशीत धक्कादायक माहिती उघड

सुनील दवंगे, शिर्डी

शिर्डीतील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाढे आता एकापाठोपाठ एक वाचले जात आहेत. समता पतसंस्थेतील 100 बनावट खाती आणि त्यातून झालेल्या 60 कोटी रुपयांच्या व्यवहार प्रकरणात आता खरातची पत्नी कल्पना खरात** हिचे नाव केंद्रस्थानी आले आहे. विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट खात्यांसाठी लागणारी कागदपत्रे कल्पना खरातने गोळा केल्याचे उघड झाले आहे.

तीर्थयात्रेच्या बहाण्याने फसवणूक

अशोक खरात याने ईशान्येश्वर मंदिराचे ओळखपत्र तयार करण्यासाठी आणि मोफत तीर्थयात्रा घडवून आणण्याच्या बहाण्याने अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड गोळा केले होते. 

प्रतिभा चाकणकरांचा जबाब

शिर्डी पोलिसांनी जेव्हा प्रतिभा चाकणकर यांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी खळबळजनक माहिती दिली. त्यांनी आपली आणि आपल्या दोन्ही मुलांची कागदपत्रे कल्पना खरात हिच्याकडे सोपवली होती.  या कागदपत्रांचा गैरवापर करून पीडितांच्या नावावर बनावट खाती उघडण्यात आली आणि त्यातून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आले.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: खरातच्या कार्यक्रमात गेले, हसत-हसत भाषणही ठोकलं; वरिष्ठ IPS अधिकारी गोत्यात? VIDEO समोर)

तपास कुठपर्यंत?

शिर्डी पोलिसांनी आतापर्यंत 57 संशयास्पद खातेदारांपैकी 35 जणांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशी झालेल्या सर्व खातेदारांनी सांगितले की, "आम्ही केवळ देवदर्शन आणि तीर्थयात्रेच्या हेतूने कागदपत्रे दिली होती, ही बँक खाती आमची नाहीत." कल्पना खरातवर यापूर्वीच फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचे गुन्हे दाखल आहेत. आता या नवीन प्रकरणामुळे तिची रवानगी कारागृहात होण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर यांच्या जबाबामुळे या संपूर्ण साखळीत कल्पना खरातचा सक्रिय सहभाग असल्याचे तांत्रिक पुराव्यांवरून सिद्ध होत आहे. पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून ही खाती उघडली गेली का, याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.

(नक्की वाचा-  Ahilyanagar News: कॅन्सर बरा करणारा ‘गडगे महाराज' अडचणीत? अंनिस आक्रमक)

बनावट खात्यांतून फिरवलेले 60 कोटी रुपये नक्की कोणाचे होते? हा पैसा काळ्या बाजारातील होता की भक्तांची फसवणूक करून जमा केलेला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस खरात दांपत्याच्या मालमत्तेचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com