Kalyan News : बापाने अडीच वर्षांच्या चिमुरडीचा गळा चिरला, रुग्णालयाकडून दुर्लक्ष; पीडित आईचं आक्रंदन

कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या पित्याने आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या पित्याने आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आईच्या सतर्कतेमुळे मुलीचा जीव वाचला असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. नराधम बापाच्या तावडीतून चिमुरडीला वाचवलं, मात्र रुग्णालयाच्या निष्काळजीपणातून महिलेवर मोठं संकट उभं राहिलं आहे. 

बापाने लेकीचा गळा चिरला...

कल्याण पूर्वेतील खडेगोळी परिसरात राहणारे लक्ष्मी दिनकर आणि तिचा पती विलास दिनकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. पतीकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून लक्ष्मी मध्यप्रदेशातील आपल्या माहेरी गेली होती. मात्र विलास दिनकर तिथे जाऊन अडीच वर्षांच्या मुलीला आपल्या सोबत घेऊन कल्याणला परत आला. 20 दिवस विलास आपल्या मुलीला घेऊन बेपत्ता होता. यानंतर लक्ष्मीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देत पतीकडून तिला आणि मुलीला जीवितास धोका असल्याचं सांगितलं होतं. 

Advertisement

नक्की वाचा - Dhule News : लग्नापूर्वीच गर्भवती, पोटातील बाळ पाडण्यासाठी भयंकर केलं; तरुणीच्या मृत्यूने कुटुंब हादरलं!

दरम्यान गुरुवारी सकाळी विलासने चिमुकली अदितीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आई लक्ष्मीची नजर पडताच तिने धाव घेत मुलीला वाचवलं. जखमी अवस्थेत मुलीला घेऊन लक्ष्मी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये गेली. मात्र गंभीर जखमा असतानाही डॉक्टरांनी केवळ क्रीम लावून तिला घरी पाठवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. मुलीची प्रकृती खालावत असल्याने लक्ष्मीने तिला इतर खाजगी रुग्णालयात नेलं. मात्र जास्त खर्च सांगितल्याने अखेर लक्ष्मी मुलीला घेऊन कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या येथे चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आरोपी विलास दिनकर याच्या शोधात आहेत. तसेच उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणावरही कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Topics mentioned in this article