Kalyan News: आमच्या जावयाला का मारले ? जाब विचारायला गेलेल्या सासू-सासऱ्यावर तलवारीने हल्ला

डोंबिवलीतील उसरघर परिसरात राहणारे आनंद संते यांच्या पाण्याच्या पाईप लाईनवरुन शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

पाण्याच्या पाईप लाईनवरून जावयाचे शेजाऱ्या सोबत भांडण झाले. गावातील भांडणामध्ये तुम्ही आमच्या जावयाला का मारले ? याचा जाब विचारायला गेलेल्या सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली नजीकच्या आगासन परिसरात घडली आहे. तलवार आणि दगडाने झालेल्या हल्ल्यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोंबिवलीतील उसरघर परिसरात राहणारे आनंद संते यांच्या पाण्याच्या पाईप लाईनवरुन शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला. हा वाद हाणामारीत रुपांतरीत झाला. आनंद संते यांना शेजाऱ्यांकडून मारहाण झाली. आनंद संते यांचा ज्याच्या सोबत वाद झाला होता, त्या लोकांनी आगासन गावातील आपल्या नातेवाईकांना बोलावून आनंद संते यांना मारहाण केली. आनंद संते यांच्यावर डोंबिवलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: 110 दहशतवादी ठार, 9 दहशतवादी अड्डे , पाक एअर बेस, ऑपरेशन सिंदूर मध्ये काय काय घडलं?

Advertisement

या दरम्यान आनंद संते यांचे सासरे दशरथ म्हात्रे आणि त्यांची पत्नी सविता म्हात्रे आणि इतर नातेवाईक आगासन गावात पोहचले. आनंद संते आणि त्यांच्या शेजाऱ्यांचा त्यांच्या आपसातील भावाचे भांडण होते. तुम्ही  आमच्या जावयाला मारायला का गेले ? हा जाब विचारण्यासाठी  गेले असता, त्याठिकाणी समोरच्या लोकांनी म्हात्रे कुटुंबियांवर तलावारीने हल्ला केला. जोरदार दगड फेक केली गेली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट

कसेबसे लोक आपला जीव वाचवून आगासन गावातून पळाले. या हल्ल्यात दशरथ म्हात्रे आणि सविता म्हात्रे गंभीर जखमी आहेत. आगासन गावातील काही लोक जखमी असल्याची माहिती आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या प्रकरणात म्हात्रे कुटुंबीयांच्या आरोप आहे की पोलीस ज्या प्रकारे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या प्रकारे गुन्हा दाखल करीत नाहीत. आम्हाला न्याय पाहिजे आमच्या जीव घेण्याच्या प्रयत्न झाला आहे असं म्हात्रे कुटुंब बोलत आहे. 

Topics mentioned in this article