जाहिरात

Operation Sindoor: 110 दहशतवादी ठार, 9 दहशतवादी अड्डे , पाक एअर बेस, ऑपरेशन सिंदूर मध्ये काय काय घडलं?

पाकिस्तानने पुन्हा हिंमत केली तर त्यांना असा धडा शिकवू की ते कधी विसरणार नाही असा दम ही भारतानं भरला आहे.

Operation Sindoor: 110 दहशतवादी ठार, 9 दहशतवादी अड्डे , पाक एअर बेस, ऑपरेशन सिंदूर मध्ये काय काय घडलं?
नवी दिल्ली:

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हातात घेतलं होतं. या ऑपरेशनमध्ये पाकिस्ताला जोरदार दणाक दिल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. भारताने केलेल्या हल्ल्यात  जवळपास 110 दहशतवादी ठार झाले. भारताने जवळपास 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने भारतीय नागरिकांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे एअर बेस उद्धवस्त केले अशी माहिती सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत, लष्कराचे लेफ्टनंट जनरल राजीव घई, डीजीएमओ, नौदलाचे व्हाईस एडमिरल ए.एन. प्रमोद, डीजी, नेव्हल ऑपरेशन्स आणि हवाई दलाचे एअर मार्शल ए.के. भारती, डीजी, एअर ऑपरेशन्स सहभागी झाले होते. 

Latest and Breaking News on NDTV

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या पत्रकार परिषदेत भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल माहिती देण्यात आली. आम्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशत वाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. लाहोरमधील रडार सिस्टीम देखील उद्ध्वस्त केल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेश सिंदूर करण्यात आले होते. त्यात दहशतवाद्यांचे अड्डेच भारतीय सैन्याने लक्ष्य केले. बहावलपूरच्या दहशतवाद्यांच्या कॅम्पला अचूक लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला  पाक सैन्यावर केला नाही असं ही यावेळी स्पष्ट करण्यात आले.  दहशतवाद्यांची नऊ स्थळ उद्धवस्त केली. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. त्यानंतरच्या कारवाईत जवळपास 110 दहशतवादी मारले गेले. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Thane News: आईचा अपघाती मृत्यू, मुलीने वडिलांना कोर्टात खेचलं, 32 लाखांची भरपाई मिळाली

त्यानंतर पाकिस्तानने मात्र  आपल्या नागरिकांवर हल्ले केले. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ले हाणून पाडण्यात आले. भारताने  एअर टू सरफेस क्षेपणास्त्रांचा वापर केला. पाकिस्तानने भारतीय सैन्य तळावर हल्ला केला.  आठ आणि नऊ तारखेला पाकिस्तानने ड्रोन हल्ले केल. सुरक्षा प्रणालीच्या माध्यमातून हे ड्रोन हल्ले निष्क्रिय करण्यात आले. नागरी विमानाचं कोणतही नुकसान झालेलं नाही. 10 मे ला भारताच्या एअर बेसवर पाकिस्तानने हल्ला केला होता. ते हल्ले भारताने परतवून लावले आहेत. नागरी विमानांची ढाल करून पाकिस्तानने हे हल्ले केले. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भारताने केलेल्या कारवाईचे व्हिडीओ सैन्य दलाने यावेळी दाखवले. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट

पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. पाकने नऊ एअर बेसवर हल्ला केला होता असं ही यावेळी सांगण्यात आलं.गरुड स्नायपरच्या माध्यमातून पाकिस्तानचे  ड्रोन पाडण्यात आले. भारताने केलेल्या हल्ल्यात युसूफ अजहर हा दहशतवादी ठार झाला आहे. आम्ही एकही टार्गेट करु शकत नाही असं पाकिस्तानमध्ये एकही ठिकाण नाही असं भारतीय सैन्य दलाने यावेळी स्पष्ट केले.  आमचा लढा हा दहशतवाद्यांशी होता. त्यामुळे प्रत्युत्तर देण्या शिवाय पर्याय नव्हता. पाकिस्तान सैन्यातील  30 ते 35 सैनिक मारले गेले आहेत. मुरिदके इथं  कसाबने प्रशिक्षण घेतलं होतं. तो तळही उद्धवस्त केला. नौदलाने ही सर्व तयारी केली होती. गरज पडली असती तर नौदल ही तयार होतं असं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension: 2 महिन्यांची सुट्टी, पण देशासाठी जवानाला 10 दिवसात जावं लागलं सीमेवर

पाकच्या नौदला बाबत आमच्याकडे सर्व माहिती होती. तिन मोठ्या दहशतवाद्यांचा या हल्ल्यात खात्मा केला गेला आहे. भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानने चर्चेची तयारी दर्शवली होती. भारताची अखंडता आणि सुरक्षा महत्वाची आहे. भारताच्या सार्वभौमतेला धक्का खपवून घेतला जाणार नाही. एअर बेस नष्ट झाल्याने पाकिस्तान हतबल झाला होता. भारताच्या नागरिवस्त्यांवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या एअर बेसवर हल्ले केले असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान दहशतवाद्याचे तळ उद्धवस्त केल्याचे पुरावे यावेळी देण्यात आले. पाकिस्तानने पुन्हा हिंमत केली तर त्यांना असा धडा शिकवू की ते कधी विसरणार नाही असा दम ही भारतानं भरला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com