अमजद खान, प्रतिनिधी
बेकायदा बांधकामाच्या सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. दुर्योधन पाटील या माजी नगरसेवकानंच हा सर्व प्रकार केला आहे. या प्रकरणात तब्बत 24 तासांनंतर पाटील आणि त्याचा मुलासह साथीदारांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'आम्ही इतके अन्याय आणि अत्याचार दहशत सहन करुन घेणार नाही. वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेऊन दुर्योधन पाटील याची सर्व बांधकामे पाडली पाहिजेत,' अशी मागणी केडीएमसी अधिकारी राजेंद्र साळूंखे यांनी केली आहे. आहे. पाटीलने या आधीही तीन कर्मचाऱ्यांना बांधून मारहाण केली होती. त्या प्रकरणातही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला नव्हता.
काय आहे प्रकरण?
कल्याण जवळच्या वडिवली परिसरात बेकायदा बांधकामे सुरु आहे. या बांधकामाच्या विरोधात कारवाई केली जाते, असा केडीएमसीचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी केडीएमसीचे अधिकारी कारवाई करण्यासाठी जातात.त्यांना मज्जाव केला जातो. प्रसंगी मारहाण केली जाते. असाच एक प्रकार कल्याणच्या वडिवली परिसरात समोर आला आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील याच्याकडून केले जात असलेल्या बांधकामाचे सर्वेक्षण करण्यासाठी केडीएमसी अधिकारी राजेंद्र साळूंखे, अधीक्षक शिरीष गर्जे आणि इतर कर्मचारी गेले होते.
( नक्की वाचा : नणंदेचं 'ते' प्रकरण उघड केलं म्हणून नवरा संतापला, बायकोच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवला आणि... )
संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याठीकाणी दुर्योधन पाटील, त्याचा मुलगा वैभव पाटील आणि अन्य लोक आले. आमच्या बांधकामाच्या ठिकाणी येण्याची तुमची येण्याची हिंम्मत कशी झाली. असे बोलत वैभव पाटील याने त्याच्या जवळची रिव्हॉल्व्हर काढून अधिकाऱ्यांवर दिशेने रोखली. त्यानंतर दुर्योधन पाटील याने शिरीष गर्जे यांना काठीने मारहाण केली. टाक आणि भामरे नावाच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
हे अधिकारी कसेबसे तिथून पळाले आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला. .सोशल मिडियावर या प्रकरणाची चर्चा सुरु झाल्यावर केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. याच दरम्यान सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील हे मोबाईल बंद करुन अज्ञातवासात गेले. त्याना शोधून काढण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानंतर प्रमोद पाटील यांनी राजेंद्र साळूंके आणि शिरीष गर्जे यांच्यासोबत जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आत्ता कुख्यात माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्यावर पोलिस कधी कारवाई करतात. याकडे सगळयाचे लक्ष लागले आहे.