Kalyan News: कल्याण पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 34 कोटींची ब्राऊन शुगर जप्त, पठाण गँगच्या म्होरक्याला अटक

कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 34 कोटी रुपये किमतीचा ब्राऊन शुगर साठा जप्त केला आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात तस्कर अमजद पठाण याला अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kalyan Crime News Today

Kalyan Crime News Today : कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 34 कोटी रुपये किमतीचा ब्राऊन शुगर साठा जप्त केला आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात तस्कर अमजद पठाण याला अटक करण्यात आली आहे.अमजद पठाण याच्यावर चार खुनांसह एकूण 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे परिसरातील संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या रॅकेटवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. 

काही दिवसांपूर्वी कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त पथक आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून संयुक्त कारवाई करत 32 कोटी रुपयांचा ब्राऊन शुगर साठा जप्त केला होता.तपासादरम्यान हा अंमली पदार्थ कुख्यात पठाण गँगचा असल्याचे निष्पन्न झाले.हा ब्राऊन शुगर नाशिकहून कल्याणमध्ये आणण्यात आला होता. कल्याण तसेच आसपासच्या भागात त्याचे वितरण होणार असल्याची माहिती समोर आली.या प्रकरणात पोलिसांनी कासिम वसेकर,कृष्णा हळेमणी,गणेशन जंगमार आणि सद्दाम शेख यांना अटक केली होती. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीत 'या' तारखेला देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन, हजारो तरुणांना मिळणार रोजगार

त्या गँगची परिसरात मोठी दहशत

त्यानंतर मुख्य आरोपी अमजद पठाण याचा शोध सुरू करण्यात आला होता.अखेर पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळवले.अमजद पठाण 1995 पासून अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय होता. त्याच्यावर एकूण 20 गुन्हे दाखल असून त्यात चार खुनांच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अमजदविषयी किंवा त्याच्या अवैध धंद्यांबाबत पोलिसांना माहिती पुरवणाऱ्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या केल्याचेही आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. यामुळे या गँगची परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.

नक्की वाचा >> Pune News: पुणेकरांनो अलर्ट राहा, 'या' 4 ठिकाणी पावसाने घातला धुमाकूळ, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

अमजद पठाणचा भाऊ देखील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातील जेठा कंपाऊंड याकूब मंजिल इमारतीत राहणाऱ्या अमजद पठाणचा भाऊ देखील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची नोंद असून,त्याचा दिल्लीत अपघातात मृत्यू झाला होता. पठाण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास आणि संघटित नेटवर्क यामुळे या गँगचा प्रभाव अनेक वर्षे कायम होता. 

दरम्यान,अमजद पठाण अटकेत असला तरी त्याचे काही महत्त्वाचे साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत आहे.ब्राऊन शुगर तस्करीव्यतिरिक्त या गँगचा इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का,याचाही तपास पोलीस करत आहेत.या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती,आर्थिक व्यवहार आणि इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशी अधिक तीव्र केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ड्रिल मशीन आणि कटरच्या सहाय्याने लोकांना मारहाण करायचे. त्यांना तडफडून मारायचे. डोक्यात ड्रिल मशीन टाकायचे. हाता पायाच्या बोटाचे नखे उपटायचे. हातांची बोटे कापायचे. सहा ते सात तास लोकांना मारायचे.