कल्याण पोलिसांची मोठी कारवाई, रात्री-बेरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक

कल्याण स्टेशन परिसरात रात्री-बेरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

मध्य रेल्वेवरील कल्याण हे कायम गजबजलेलं स्टेशन आहे. लोकल तसंच लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसचा हा महत्त्वाचा स्टॉप आहे. त्यामुळे स्टेशन आणि परिसरात नेहमी वर्दळ असते. रात्री उशीरा कल्याण स्टेशनला उतरुन घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रात्री-बेरात्री स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या चार लुटारुंना अटक करण्यात आली आहे. चौघांपैकी दोन जण सराईत गुन्हेगार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी किती लोकांना लूटले आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कशी झाली कारवाई?

स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारी ही टोळी कल्याणमधील झुंझारराव मार्केटमधील एका दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पोलिसांनी सापळा रचून चार तरुणांना ताब्यात घेतले.त्यांच्यासोबत असलेला एक तरुण संधीचा  फायदा घेत पसार झाला. या टोळीकडून चाकू, हातोडा अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : दारुच्या नशेत चालवत होता 200 च्या स्पीडनं चालवत होता पोर्शे, मित्रांनीच उघड केलं रहस्य )

गोकूळ सोनावणे , उमेश सिंह, बुखन यादव , मुशेद खान अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांपैकी गोकूळ आणि उमेशच्या विरोधात या आधी देखील चोरी आणि लूटीचे गुन्हे दाखल आहेत हे पाच जण रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात येणारे जाणाऱ्यांना गाठतात. त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेत असत. अनेकदा प्रवासी या प्रकरणात तक्रार करत नाहीत याचा फायदा हे घेत होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय. 
 

Topics mentioned in this article