Kalyan News: कल्याण स्टेशन परिसरात 'पार्किंग'च्या नावावर लूट! वाचा कसा लावला जात होता मध्य रेल्वेला चुना!

Kalyan Railway Parking Scam: मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कल्याण पूर्वमधील रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या एका 'पे अ‍ॅण्ड पार्क' (Pay and Park) सुविधेवर छापा टाकून मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

Kalyan Railway Parking Scam: मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कल्याण पूर्वमधील रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या एका 'पे अ‍ॅण्ड पार्क' (Pay and Park) सुविधेवर छापा टाकून मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.  प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हे पार्किंग चालवले जात होते. या कारवाईदरम्यान पार्किंग चालकाकडे बनावट पावती पुस्तके आढळून आली आहेत. 

याप्रकरणी कारवाई पथकाने हरिशंकर प्रजापती नावाच्या पार्किंग चालकाला अटक केली असून त्याला पुढील तपासासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

या कारवाईची सुरुवात अशा प्रकारे झाली की, व्हिजिलन्स विभागातील एका सदस्याने पार्किंगमध्ये आपलं वाहन पार्क केलं आणि त्यांनी पावती घेतली. या पावतीवर "DS इंटरप्रायझेस साईट एम" असे लिहिलेले होते. अधिकाऱ्याला तत्काळ संशय आला. त्यांनी ती पावती काळजीपूर्वक तपासली असता ती बनावट असल्याचे सिद्ध झाले.

प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, पार्किंग चालकाने ही पावती स्वतः छापली होती. तसेच, घटनास्थळी सापडलेली इतर कागदपत्रेही बनावट असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News: 2 दिवसांत CEO दाखल! आमदार मिटकरींचा दौरा अकोल्याच्या डॉक्टरांसाठी ठरला कर्दनकाळ; कुणावर कारवाई ? )
 

या गंभीर गैरव्यवहारानंतर कारवाई पथकाने तात्काळ हरिशंकर प्रजापती याला ताब्यात घेतले आणि त्याला पुढील तपासासाठी RPF कडे सोपवले आहे. RPF ने आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.  हरिशंकर प्रजापती किती कालावधीपासून हे पार्किंग चालवत होता, त्याने रेल्वे प्रशासनाची नेमकी किती मोठी फसवणूक केली आहे  याचा आरपीएफ शोध घेत आहे. या घोटाळ्यात त्याला रेल्वे अधिकारी किंवा अन्य कोणत्या अधिकारी वर्गाची साथ होती का, या वेगवेगळ्या अंगांनी तपास केला जात आहे.

( नक्की वाचा : Kalyan News : हद्द झाली! कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे 'राज'; दुकानदार,पत्नीला मारहाणीचा थरार )
 

Topics mentioned in this article