अमजद खान, प्रतिनिधी
मध्य रेल्वेचं एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन म्हणून कल्यामची ओळख आहे. मुंबई उपनगरी लोकल तसंच लांब पल्ल्यांच्या अनेक रेल्वेंचा कल्याणमध्ये थांबा आहे. त्यामुळे इथं कायम प्रवाशांची वर्दळ असते. तुम्ही देखील कल्याण रेल्वे स्टेशनवर जात असाल तर सावध राहा. कारण तुमची मैत्री करुन तुम्हाला लुटण्याचा प्रकार घडू शकतो. या प्रकारची एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामध्ये एका प्रवाशाची मैत्री करण्यात आली. त्यानंतर खाद्य पदार्थात गुंगीचे औषध टाकून त्याला लुटण्यात आले. आरपीएफ आणि जीआरपीच्या सतर्कतेमुळे आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
शत्रुघ्न निशाद या प्रवाशाला मंगळवारी उत्तर प्रदेशात जायचे होते. त्यासाठी तो कल्याण रेल्वे स्टेशनवर आला, तो ट्रेनच्या प्रतिक्षेत पादचारी पूलावर बसला होता. त्याच वेळी आरोपी रामसूरत पाल त्याच्याजवळ आला. त्याने त्याची विचारपूस सुरु केली. तुम्हाला कुठे जायचे आहे. त्यावेळी शत्रुघ्ननं पालला कुठे जायचे हे सांगितले. त्यानेही त्याला त्याठिकाणी मलाही जायचे आहे असे सांगितले. आरोपी 12 च्या सुमारास एक बिस्कीट घेऊन आला. त्याने शत्रुघ्नला बिस्कीट दिले. बिस्कीट खाताच शत्रुघ्न बेशूद्ध झाला.
शत्रुघ्नला गुंगीचं बिस्कीट देणारा व्यक्ती कल्याण रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडत होता. त्यावेळीच त्याला रपीएफ आणि जीआरपीने थांबविले. आरपीएफचे अधिकारी अनिल उपाध्याय. भागवान पाटील आणि रविंद्र चव्हाण यांनी त्याची चौकशी सुरु केली. त्याच्यावर काय वस्तू आहेत याची माहितीच आरोपीला नव्हती. त्यानंतर त्याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले.
( नक्की वाचा : Viral Video : जेवणात लघवी मिसळत होती मोलकरीण, व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून उघड झालं सत्य )
पोलीस रामसूतर पालची चौकशी करीत असताना शत्रुघ्न निशाद पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. एकिकडे पोलिसांना रामसूरत सापडला होता. तर दुसरीकडे शत्रुघ्न पोलिस स्टेशनमध्ये आला होता. दोघांना एकमेकांना समोरासमोर केले असता लूटीचा प्रकार उघड झाला. रामसूरत पालवर 2003 पासून गूंगीचे औषध देऊन लूटण्याचे गुन्हे दाखल आहे. गेल्या 21 वर्षापासून तो मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनमध्ये हा प्रकार करीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.