कल्याणमध्ये काय चाललंय? प्रसिद्ध शाळेच्या CEO कडून शाळेत अश्लील कृत्य! पालकांना मिळाला Video

Kalyan School : कल्याण पूर्वमधील प्रसिद्ध साई शाळा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी 

Kalyan School : कल्याण पूर्वमधील प्रसिद्ध साई शाळा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या शाळेचा पदाधिकारी त्याच्या मित्रासोबत शाळेत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. त्याबाबतचा व्हिडिओच आपल्या हातामध्ये लागला आहे, असा पालकांचा दावा आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोलिसांना दिला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी ट्रस्टींनी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्वच्या साई शाळेतील ट्रस्टींमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.  या शाळेतील एका पदाधिकाऱ्यावर एका मित्रासोबत शाळेत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या संदर्भात केडीएमसीच्या एका माजी नगरसेवकाकडे काही पालकांनी तक्रार केल्याचे सांगितले होते. आता थेट पालकांनी कोळसेाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार )
 

पालकांनी शाळेत सुरु असलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्यायदे यांच्याकडे सादर करुन कारवाईची मागणी केली आहे. याबाबत गणेश न्यायदे यांनी तक्रार प्राप्त झाल्याचा दुजोरा दिला आहे. संबंधित व्हिडिओची चाैकशी सुरु आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

ट्रस्टींनी काय सांगितले?

या शाळेचे ट्रस्टी गिरीबाबू यांनी या प्रकरणात 'NDTV मराठी' शी बोलताना सांगितलं की, शाळेत अश्लील कृत्य होत असल्यास असल्यास ही गंभीर बाब आहे. पोलिसांकडे पालकांनी तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या शाळेत पाच हजार विद्यर्थी शिकतात. मोठी शाळा  विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. या प्रकरणामुळे शाळा बदनाम होत आहे.


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world