जाहिरात

Dombivali News: व्याजी पैसे देऊन महिलांकडे शरीरसुखाची मागणी, एका महिलेवर वारंवार अत्याचार, कोर्टाने दिला दणका

नराधमाने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला.तसच तिच्या पतीलाही रेल्वेचं कंत्राट देतो असं सांगून त्याच्याकडून 10 लाख रुपये उकळले.

Dombivali News: व्याजी पैसे देऊन महिलांकडे शरीरसुखाची मागणी, एका महिलेवर वारंवार अत्याचार, कोर्टाने दिला दणका
Dombivali Woman Assaulted Case
मुंबई:

Dombivali Crime News : डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर करणाऱ्या या नराधमाने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला.तसच तिच्या पतीलाही रेल्वेचं कंत्राट देतो असं सांगून त्याच्याकडून 10 लाख रुपये उकळले. व्याजावर पैसै वसूल करण्याच्या बदल्यात महिलांकडे शरीर सुखाची मागणीही केल्याचा धक्कादायक प्रकार या आरोपीनं केल्याचं उघडकीस आलंय.रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, त्याचा जामीन अर्ज आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.या प्रकरणात तो फरार असल्याची माहिती फिर्यादीच्या वकिलांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तिला घरी बोलावलं. त्यानंतर तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.तसच तिचा व्हिडीओ आणि फोटो काढून तिला दाखवलं. हा प्रकार कोणाला सांगितला तर, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.पीडितेला सतत धमकी देऊन आरोपी काही वर्षे तिच्यावर अत्याचार करत राहिला.

नक्की वाचा >> Kalyan News : हायप्रोफाईल सोसायटीतील रहिवासी संतापले, महापालिकेमुळे 'त्या' 112 कुटुंबावर वणवण भटकण्याची वेळ

महिलेच्या पतीला जबर मानसिक धक्का बसला अन्..

पीडित महिलेच्या पतीच्या लक्षात आलं की,आरोपी त्याची फसवणूक करत आहे.पत्नीमुळे पती त्याच्या संपर्कात आला होता. पतीने पत्नीला फसवणूक झाल्याचे सांगितले.त्यानंतर पत्नीनेही पतीला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर पतीला जबर मानसिक धक्का बसला. पती पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी रहीम पद्मसी उर्फ करीम मोहंमद जैन उर्फ करम जोशी याच्या विरोधात 8 मार्च रोजी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.आरोपीने कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती फिर्यादीचे वकिल महेश शिवदास यांनी दिली आहे.धक्कादायक म्हणजे फरार आरोपी हा व्याजावर पैसै देतो.अनेक महिलांना त्याने व्याजी पैसे दिले आहे. व्याजी पैशाच्या वसुलीसाठी तो संबंधित महिलांकडे शरीर सुखाची मागणी करतो, असा आरोप संबंधित महिलांकडून करण्यात आला आहे. त्या महिलांनी आरोपीविरोधात तक्रार करण्यसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com