Kalyan Station: आई-वडिलांना गाढ झोपेत पाहून बाळाला पळवले! तरुण-आत्याने 8 महिन्यांच्या चिमुकल्याचे काय केले?

Kalyan Station Child Kidnapping: कल्याण रेल्वे स्टेशनच्या (Kalyan Railway Station) पादचारी पुलावर झोपलेल्या एका मजुराच्या कुटुंबातून 8 महिन्यांच्या बाळाची चोरी (Child Kidnapping) झाल्याची धक्कादायक घटना घडली.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kalyan News : सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एक तरुण पुलावर आला. त्याने झोपलेल्या कुंचे कुटुंबाकडे पाहिले आणि इकडे-तिकडे नजर टाकली.
कल्याण:

Kalyan Station Child Kidnapping: कल्याण रेल्वे स्टेशनच्या (Kalyan Railway Station) पादचारी पुलावर झोपलेल्या एका मजुराच्या कुटुंबातून 8 महिन्यांच्या बाळाची चोरी (Child Kidnapping) झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, कल्याण रेल्वे पोलिस (Kalyan GRP) आणि महात्मा फुले पोलिसांनी (Mahatma Phule Police Station) अवघ्या 6 तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावत, बाळाची सुटका केली आणि आरोपी तरुण अक्षय खरेसह (Akshay Khare) त्याची आत्या सविता खरे (Savita Khare) या दोघांना बेड्या ठोकल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्याहून (Pune) आलेले नीलेश कुंचे आणि त्यांची पत्नी पूनम पोंगरे हे मोलमजुरी करणारे कुटुंब होते. कामाच्या शोधात ते 2 नोव्हेंबरला कल्याणला आले, पण त्यांना काम किंवा राहण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे ते आपल्या 3 मुलांसह कल्याण स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या पादचारी पुलावर झोपले होते.

सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एक तरुण पुलावर आला. त्याने झोपलेल्या कुंचे कुटुंबाकडे पाहिले आणि इकडे-तिकडे नजर टाकली. संधी साधून, त्याने झोपलेल्या 3 मुलांपैकी सर्वात लहान असलेल्या 8 महिन्यांच्या बाळाला उचलले आणि तेथून सिंडीकेट परिसराच्या (Syndicate Area) दिशेने निघून गेला.

( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
 

सकाळी जाग आली आणि...

सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नीलेश आणि पूनम पोंगरे झोपेतून जागे झाले, तेव्हा त्यांच्याजवळ झोपलेल्या 3 मुलांपैकी 8 महिन्यांचे बाळ गायब असल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने बाळाचा आजूबाजूला शोध घेतला, पण बाळ कुठेही सापडले नाही.

Advertisement

सकाळी 6:30 वाजता, त्यांनी कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि बाळाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, कल्याण रेल्वे पोलिसांच्या (GRP) सोबत महात्मा फुले पोलिसांनीही तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी (Senior PI Balkrishna Pardeshi) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके (Police Officer Vikas Madke) यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.

( नक्की वाचा : Shocking: लग्नाच्या जेवणात हा काय प्रकार? प्रत्येक रोटीवर थुंकणाऱ्या व्यक्तीचा Video Viral )
 

6 तासांत आरोपींना अटक

पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये अक्षय खरे हा तरुण बाळाला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत होता. सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 6 तासांच्या आत आरोपीला सिंडीकेट परिसरामध्ये शोधून काढले.

Advertisement

बाळाची चोरी करणारा आरोपी तरुण अक्षय खरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासामध्ये अक्षयची आत्या सविता खरे हीचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे तिलाही अटक करण्यात आली आहे.

बाळाला विकण्याच्या उद्देशानेच ही चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अक्षय खरे चोरी करण्यामागील नेमके कारण सांगत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article