
अमजद खान, प्रतिनिधी
सामान उधार देणार नाही, पैसे दे असे सांगणाऱ्या दुकानदाराला तरुणानं मारहाण केली. या मारहणीची दुकानदारनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यानंतर या तरुणाने पुन्हा त्याला शिवीगाळ केली. या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या दुकानदाराच्या भावावर तरुणानं चाकूनं हल्ला केलाय. राकेश पवार असं या तरुणाचं नाव असून कल्याणमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम काळा तलाव परिसरात नितेश काळे हे त्याचा भाऊ पंकज आणि कुटुंबासह राहतात. नितेश यांचे याच परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. तर, त्यांचा भाऊ पंकज हा गोल्डन पार्क येथील फिटनेस प्रोफेसी जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतो. नितेश यांच्या दुकानातून राकेश पवार (राहणार ठाकरपाडा) उधारीनं किराणा सामान घेत होता. शनिवारी रात्री दहा वाजता राकेश नेहमीप्रमाणे नितेशच्या दुकानात उधारीनं किराणा सामान नेण्यासाठी आला. त्यावेळी नितेशनं त्याला यापूर्वी नेलेल्या किरणा सामानाचे पैसे दे, त्यानंतरच नवीन घेऊन जा, असे सांगितलं. राकेशला त्याचा राग आला. त्यानं शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने नीतेशला बेदम मारहाण केली.
( नक्की वाचा : कल्याणच्या चप्पल विक्रेत्याचे 'डर'मधील शाहरुखसारखे उद्योग, पोलिसांनी जिरवली मस्ती )
नितेशनं बाजारपेठ पोलीस ठाण्यात राकेश विरुध्द तक्रार केली. याची माहिती मिळताच संतापलेल्या राकेशनं नितेशच्या किरणा दुकानाजवळ येऊन त्याला दमदाटी करण्यास सुरुवात केली. नितेशनं त्याचा भाऊ पंकजला व्यायामशाळेतून बोलावून घेतली. पंकज राकेशला समजावून सांगत असताना राकेशनं अचानक स्वत:च्या खिशातून चाकू बाहेर काढला आणि पंकजवर हल्ला केला.
जखमी पंकजला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .राकेश पवार फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world