शिक्षकच झाले भक्षक! नोट्स निमित्त, विद्यार्थीनीशी मैत्री आणि... 3 नराधमांनी केलं भयंकर कृत्य

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नरेंद्रने सुरुवातीला शैक्षणिक नोट्स देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी संपर्क साधला. सतत मेसेज करून तिच्याशी मैत्री वाढवली

जाहिरात
Read Time: 2 mins
पोलिसांनी या प्रकरणात 2 प्राध्यापक आणि त्यांच्या मित्राला अटक केली आहे.
मुंबई:

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अनेक वेळा बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी दोन शिक्षक आणि त्यांच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. त्यांनी नोट्सच्या निमित्तानं विद्यार्थीनीशी जवळीक साधली. त्यानंतर तिच्याशी दुष्कर्म केले. आयटी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. 

काय आहे प्रकरण?

नरेंद्र (भौतिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक), संदीप (जीवशास्त्र विषयाचा प्राध्यापक) आणि त्यांचा मित्र अनुप हे शहरातील एका खासगी महाविद्यालयात काम करतात, जिथे पीडित विद्यार्थिनी शिकत होती.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नरेंद्रने सुरुवातीला शैक्षणिक नोट्स देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी संपर्क साधला. सतत मेसेज करून तिच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर त्याने तिला बंगळूरुमधील अनुपच्या खोलीवर बोलावले, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि कोणालाही काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.

( नक्की वाचा: Crime News: नवऱ्याला फसवण्यासाठी 5 वर्षाच्या पोटच्या मुलीची केली हत्या, महिलेचं संतापजनक कृत्य )
 

काही दिवसांनंतर, संदीपनेही त्या विद्यार्थिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर, त्याने तिला ब्लॅकमेल केले. नरेंद्रसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा करत त्याने तिला धमकावले. त्यानेही अनुपच्या घरी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी गिली. 

Advertisement

त्यानंतर अनुपने विद्यार्थिनीला आपल्या खोलीत प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून धमकावले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पीडित विद्यार्थिनीने बंगळूरुला भेटायला आलेल्या तिच्या पालकांना सर्व हकिकत सांगितली. कुटुंबीयांनी कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे संपर्क साधला आणि त्यानंतर मराठाहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दोन्ही शिक्षक आणि अनुप यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
 

Topics mentioned in this article