जाहिरात

Crime News: नवऱ्याला फसवण्यासाठी 5 वर्षाच्या पोटच्या मुलीची केली हत्या, महिलेचं संतापजनक कृत्य

Crime News: या महिलेनं तिच्या पाच वर्षांच्या पोटच्या मुलीची हत्या केली. त्याचा आळ नवऱ्यावर टाकला. तिनं हे सर्व का केलं? याचं कारणही तितकंच धक्कादायक आणि संतापजनक आहे.

Crime News: नवऱ्याला फसवण्यासाठी 5 वर्षाच्या पोटच्या मुलीची केली हत्या, महिलेचं संतापजनक कृत्य
Crime News: ही महिला पतीसोबत भांडण करुन वेगळं राहात होती.
मुंबई:

आई आणि मुलाचं नातं हे जगातील पवित्र नातं मानलं जातं. मुलांसाठी वाट्टेल ते करण्याती आईची तयारी असते. पण, या घटनेमध्ये फक्त  केवळ माणुसकीलाच नव्हे, तर मातृत्वालाही लाजवले आहे. या महिलेनं तिच्या पाच वर्षांच्या पोटच्या मुलीची हत्या केली. त्याचा आळ नवऱ्यावर टाकला. तिनं हे सर्व का केलं? याचं कारणही तितकंच धक्कादायक आणि संतापजनक आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील ही धक्कादायक घटना आहे. रोशनी खान असं या उलट्या काळजाच्या महिलेचं नाव आहे. तिनं तिच्या 5 वर्षांच्या निष्पाप मुलीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी तिचा प्रियकर उदित जयस्वाल याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. काल रात्री (सोमवार, 14 जुलै) तिचा पती शाहरुख घरी आला असता, दोघांमध्ये वाद झाला. याच दरम्यान, रोशनीने आपल्या मुलीची हत्या केली.

( नक्की वाचा: TV Actress: मिरचीचा स्प्रे, नंतर चाकूहल्ला... 'त्या' संशयातून अभिनेत्रीवर पतीचा हल्ला )

हत्या केल्यानंतर, रोशनीने स्वतः कंट्रोल रूमला कॉल करून घटनेची माहिती दिली, परंतु तिने आपल्या पतीवरच हत्येचा खोटा आरोप लावला. पोलिसांनी तपास सुरू करताच सत्य समोर आले. रोशनी तिच्या प्रियकरासोबत राहत होती आणि पतीसोबतच्या वादामुळे तिने कट रचून आपल्या मुलीला संपवले होते. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेने शहराला हादरवून टाकले आहे.

 पोलिसांना सांगितली खोटी कहाणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशीननं पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. त्यावेळी तिच्या आवाजात भीती होता. तिने पोलिस कंट्रोल रूमला सांगितले की, तिच्या मुलीची हत्या झाली आहे. तिने हे देखील सांगितले की, ही हत्या दुसऱ्या कोणी केली नसून तिच्या पती शाहरुख खानने केली आहे.

वडिल मुलीचा जीव कसा घेऊ शकतात? असं पोलिसांनी विचारलं. त्यावर रोशीननं आपलं पतीसोबत भांडण सुरु आहे. त्यामध्ये अडकवण्यासाठी पतीने माझ्या मुलीचा गळा दाबून खून केला, असा दावा रोशनीनं केला. 

(नक्की वाचा: BJP Leader: भाजपा नेत्याचे स्माशानात कारमध्ये सुरु होते प्रेमाचे चाळे, पकडले जाताच झाली गडबड, पाहा Video )

कंट्रोल रूमच्या माहितीनंतर तात्काळ कॅन्सर बाग पोलिस ठाण्याची टीम रोशनी खानच्या घरी पोहोचली. सर्वात आधी मुलीच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. असे आढळून आले आहे की, महिला रोशनी खानने कंट्रोल रूमला खोटी माहिती दिली होती. ती आपल्या पतीसोबत भांडण करून वेगळी राहत होती. येथे तिच्यासोबत तिचा प्रियकर उदित जयस्वाल राहत होता.

रोशनी खान गेल्या काही काळापासून तिचा प्रियकर उदित जयस्वालसोबत राहू लागली होती. तिच्या पती शाहरुखला हे कळल्यावर रात्री तोही तिथे पोहोचला. त्यावेळी उदित घरी नव्हता. शाहरुख घरी येताच रोशनीसोबत त्याचे भांडण झाले. याच दरम्यान, तिने आपल्या 5 वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. पतीला अडकवण्यासाठीच तिने मुलीच्या हत्येची खोटी कहाणी रचली.

लखनऊ पोलिसांनी रोशनी खानला ताब्यात घेतले आहे. पोलिस तिची चौकशी करत आहेत. लखनऊ पश्चिमचे डीसीपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुलीचे शवविच्छेदन झाले आहे आणि आम्ही रोशनी खानची चौकशी करत आहोत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com