कर्नाटकात एक महिला अशी आहे जिने 10 पुरुषांविरोधात 10 विविध तक्रारी केल्या आहेत, ज्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. यातले दोन पुरुष या महिलेचे पती आहेत. या महिलेला न्यायालयाने समन्स धाडले असून तिला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.नागप्रसन्ना यांनी या महिलेला 31 ऑगस्टपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. याचिकाकर्त्याने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाविरोधात दाखल करण्यात आलेल्या क्रूरतेचा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी करत असताना न्यायालयाच्या निदर्शनास आले की ज्या महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला गेलाय त्या महिलेने याआधीही अनेक तक्रारी केल्या आहेत ज्यांच्या आधारे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 2011 ते 2022 या काळात या महिलेने किमान 10 तक्रारी केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आले. न्यायालयाने हे देखील नमूद केले की या महिलेला प्रतिवादी करण्यात आले असून तिने किंवा तिच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडलेली नाही.
हे ही वाचा : मुंबईची सुंदरी पडली 55 वर्षांच्या पाकिस्तानी उद्योगपतीच्या प्रेमात! हनीमूनचा Video Viral
सदर महिलेने मंजुनाथ बी याच्या आणि त्याच्या कुटुंबाविरोधात 2011 साली क्रूरतेची तक्रार केली होती. चार वर्षानंतर याच महिलेने हनुमेशा नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार केली आणि गुन्हा नोंदवला गेला. त्याच वर्षी तिने संतोष नावाच्या आणखी एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार केली आणि त्याआधारे गुन्हा नोंदवला गेला. हनुमेशाविरोधात धमकी दिल्याचा तर संतोषविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारींची यादी इथेच संपली नाही, या महिलेने त्यानंतर 5 तक्रारी केल्या आणि त्याआधारे गुन्हे नोंदवण्यात आले. यातील 2 प्रकरणे बलात्काराची होती,2 क्रूरतेची होती आणि तीन विनयभंग आणि धमकावल्याची होती. या महिलेने एकूण मिळून 10 पुरुषांविरोधात गुन्हे नोंदवण्यास भाग पाडले आहे.
हे ही वाचा : Sai Tamhankar : सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'या' पोस्टमुळे चर्चेला उधाण
31 ऑगस्ट 2022 रोजी या महिलेचे लग्न झाले होते. महिलेने दावा केलाय की लग्नाच्या तीन वर्षांनी तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले. यामुळे या महिलेने नवऱ्यासह त्याच्या कुटुंबाविरोधात क्रूरता आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली असून न्यायालयाने या सुनावणीदरम्यान म्हटले की, ज्या महिलेला प्रतिवादी करण्यात आले आहे तिच्याविरोधात खंडणी उकळणे, बळजबरीने घुसखोरी करणे इत्याही प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत एका वकिलाची कर्नाटक बार काऊन्सिलकडे तक्रार केली होती, मात्र ही तक्रार फेटाळण्यात आली होती. न्यायालयाने म्हटले की हा सगळा प्रकार त्रास देण्यासाठी केलेला दिसत असून हा कायद्याचा गैरवापर असल्याचे दिसून येत आहे.