Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

जळगावात 700 पेक्षात जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असून त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kashmir Pahalgam terror attack Pakistani citizens in Jalgaon : काश्मीरमधील पहलगाममधील निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा अल्टिमेटम आज संपत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील जळगावमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावमध्ये पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य असल्याचं उघड झालं आहे. जळगावात 700 पेक्षात जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असून त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतात राहणाऱ्या या पाकिस्तानी नागरिकांकडून नियम आणि अटींचं पालन होत नसल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जळगावत वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश भोळे म्हणाले,  ही गंभीर बाब असून असे लोक जळगावमध्ये सुद्धा घातपात घडवू शकतात अशी भीती आहे. जळगावमध्ये फिरण्यासाठी पाकिस्तानी नागरिक आले मात्र व्हिजाची मुदत संपूनही परतले नसून जळगावतच वास्तव्य करत असल्याची माहिती आहे. 

Advertisement

भारतात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यातून समोर आला, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सार्क व्हिजा, टुरिस्ट व्हिजा घेऊन आलेल्या नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचा आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे .  यानंतर सुरक्षा व्यवस्था सक्रीय झाली असून जळगावात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.  

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Kashmir Terror Attack : 'भारताची ताकद दाखवून द्या'; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

 327 पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये टुरिस्ट व्हिजा घेऊन राहत असल्याची बाब समोर आली आहे, या संदर्भात शासनाचे कारवाई संदर्भातले जे आदेश येतील त्यानुसार संबंधितांवर कार्यवाही केली जाईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी ही माहिती दिली.