जाहिरात

Kashmir Terror Attack : 'भारताची ताकद दाखवून द्या'; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

'काही लोकांना समजावून सांगता येत नाही. त्यांना धडा शिकवायलाच हवा. मला आशा आहे की हे लवकरच साध्य होईल.'

Kashmir Terror Attack : 'भारताची ताकद दाखवून द्या'; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

Kashmir Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला. आनंद साजरा करणाऱ्या पर्यटकांवर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र याला प्रत्युत्तर देण्याची मागणीही देशवासियांकडून केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात संरसंघचालक मोहन भागवतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देश शक्तिशाली आहे हे दाखविण्याची वेळ आली आहे. ही लढाई कोणत्याही समाजांमधली नाही तर धर्म आणि अर्धमाची आहे. काश्मीरमध्ये दहशतवादांच्या कृत्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले, रावणाला मारण्याशिवाय रामाकडे पर्याय नव्हता. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता धर्म. त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो, असंही ते पुढे म्हणाले. 

Pehalgam attack: काश्मिरमध्ये अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत मुंबईत दाखल, विशेष विमानाने परतले

नक्की वाचा - Pehalgam attack: काश्मिरमध्ये अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत मुंबईत दाखल, विशेष विमानाने परतले

मुंबईमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यावर मोहन भागवतांनी भाष्य केलं आहे. भागवतांनी उदाहरणदाखल आपल्या भाषणात सांगितलं की, रावण हा भगवान शंकराचा भक्त होता. मात्र रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. त्यामुळे दुसरा उपायच नव्हता. शेवटी रामाला त्याचा वध करावा लागला. काही लोकांना समजावून सांगता येत नाही. त्यांना धडा शिकवायलाच हवा. मला आशा आहे की हे लवकरच साध्य होईल, असं भागवत म्हणाले.