सांगलीत एका महिलेने मुलगा आणि मुलाच्या मित्रासह मिळून पतीच्या हत्येचा प्लान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव दत्तात्रय पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. पाटील यांनी अनेकांकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. याशिवाय त्यांनी बँकेतूनही लोन काढले होते. या कर्जाला वैतागलेल्या पाटील यांची पत्नी आणि मुलाने भयंकर पाऊल उचललं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव पाटील यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते. त्यामुळे पैसे मागण्यासाठी नियमित लोक घरी येत होते. याशिवाय दत्तात्रय यांनी बँकेतूनही मोठं लोन घेतलं होतं. कुटुंब या सर्व गोष्टींना वैतागलं होतं. त्यामुळे पत्नीने मुलासह मिळून पतीचा काटा काढल्याचा प्रकार घडला आहे. पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे पैसेही मिळणार होते, त्यातून माय-लेकाने हा प्लान आखला.
महिलेने मुलगा आणि त्याच्या मित्राला सोबत घेऊन पतीचा काटा काढला आणि अपघाताचा बनाव आखला. कवठेमहांकाळ पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. बाबुराव दत्तात्रय पाटील यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री पत्नी वनिता बाबूराव पाटील (वय 40), मुलगा तेजस बाबूराव पाटील (वय 26) आणि त्याचा मित्र भिमराव गणपतराव हुलवान (वय 30) तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली