
Swargate bus stand Crime : पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनांवर अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलाकडून दोघांमध्ये सहमतीने संबंध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर अनेकांकडून तिने बस स्टँडवर आरडाओरडा का केला नाही? बसमध्ये असताना विरोध का केला नाही? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणातील सत्य अखेर समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील अत्यंत वर्दळीच ठिकाण असलेलं स्वारगेट बस स्थानकावर पहाटे 5.30 वाजता एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार करण्यात आला. या घटनेने केवळ पुणेच नाही तर राज्यभरातून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अखेर आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावातून पोलिसांकडून अटक करण्यात आली. गाडेच्या वकिलांकडून दोघेही संपर्कात असल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे. अखेर या प्रकरणातील सत्य समोर आलं आहे. बसमध्ये पीडितेवर अत्याचार सुरू होता त्यावेळी जीव वाचविण्यासाठी ती त्याची गयावया करीत असल्याचं पोलीस सूत्रांच्या माहितीतून समोर आलं आहे.
नक्की वाचा - Pune Crime : आई घराबाहेर जाताच नराधम बाप लेकीच्या जवळ...; नांदेड सिटीतील घटनेने पुणे पुन्हा हादरलं!
नेमकं काय आहे सत्य?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्तात्रय गाडे याने आपण कंडक्टर असल्याचं खोटं सांगितलं आणि पीडितेला बसमध्ये घेऊन गेला. बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा बंद केला. याशिवाय चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. यानंतर गाडीत कोणीच नसल्याचं पीडितेच्या लक्षात आलं. ती बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागली. मात्र गाडेने पीडितेला बसच्या सीटवर ढकललं. पीडितेने मदतीसाठी आरडाओरडाही केला. मात्र आरोपीने तिचा गळा आवळला. त्यामुळे ती घाबरली होती. पीडिता प्रतिकार करीत नसल्याचं लक्षात येताच आरोपीने दुसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार केला. काय करायचं ते कर, पण मला जिवंत ठेव असं म्हणत ती निपचित पडून राहिली होती आणि आरोपी तिच्यावर अत्याचार करीत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे. जीव वाचविण्यासाठी आरोपीकडून होणाऱ्या अत्याचाराला ती विरोध करू शकली नाही असं यातून समोर आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world