जाहिरात

Kalyan News: केडीएमसीच्या 2 महिला कर्मचाऱ्यांचा बारमधील धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल, कल्याणमध्ये खळबळ

इराणचा ग्रीन प्लास्टिक मिळत नसल्याने कल्याणमधील काही व्यापारी साधा प्लास्टिक वापरत आहेत.प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर केडीएमसीच्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Kalyan News: केडीएमसीच्या 2 महिला कर्मचाऱ्यांचा बारमधील धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल, कल्याणमध्ये खळबळ
KDMC Female Employee Viral Video

KDMC Female Staff Viral Video :  इराणचा ग्रीन प्लास्टिक मिळत नसल्याने कल्याणमधील काही व्यापारी साधा प्लास्टिक वापरत आहेत.प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर केडीएमसीच्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती, असा आरोप करण्यात आला होता.या घटनेची तातडीनं दखल घेत कल्याण डोंबिवली महापालिकेनं या दोन महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. प्लास्टिक बंदीच्या कारवाई दरम्यान या महिलांनी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. केडीएमसीच्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर महापालिकेकडून 2 महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व येथील हनुमान नगर परिसरातील ‘क्रिस बार अँड रेस्टॉरंट' येथे केडीएमसीच्या प्लास्टिकविरोधी पथकाने कारवाई केली. या पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितलं. हॉटेलमध्ये काही प्रमाणात प्लास्टिक आढळून आले होते.यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोबाईलद्वारे हॉटेल चालकाशी संपर्क साधला.हॉटेल चालक साईराज करमरण यांनी महिला कर्मचाऱ्याला सांगितले की, आम्ही ग्रीन प्लास्टिक वापरतो.मात्र इराणमधून येणाऱ्या केमिकलच्या तुटवड्यामुळे सध्या ग्रीन प्लास्टिक उपलब्ध नसल्याने अन्य प्लास्टिक वापरावं लागतं.

नक्की वाचा >> Dombivli News: भर रस्त्यात कार चालक आणि मित्रावर केला प्राणघातक हल्ला, डोबिंवलीतील घटनेमागचं कारण थक्क करणारं

संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ समोर

कारवाई टाळण्यासाठी हॉटेल चालकाने महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र,त्यांनी तीन हजार रुपये देण्याची मागणी केली.व्यवस्थापकांनी एक हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली,पण त्यावर कर्मचारी तयार झाले नाहीत.त्यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला.अखेर व्यवस्थापकांनी एका कर्मचाऱ्यामार्फत दोन हजार रुपये दिल्यानंतर महिला कर्मचारी तेथून निघून गेल्या.दरम्यान,या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ समोर आले आहेत.

नक्की वाचा >> Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांचं पार्थिव थोड्याच वेळात निवासस्थानी पोहोचणार

या प्रकरणाची दखल घेत केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी संबंधित दोन महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे आदेश दिले आहेत.तसेच संबंधित हॉटेलवरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्लास्टिक बंदीच्या नावाखाली कंत्राटी कर्मचारी पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.अशा प्रकारे किती व्यापाऱ्यांकडून वसुली झाली आहे,याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे केडीएमसीच्या प्लास्टिकविरोधी कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com