Lohagad Fort Murder: दिवाळी पार्टीत ओळख अन् लोहगडवर हत्येचा प्लान! सिया गोयलच्या CDRमधून धक्कादायक माहिती समोर

Lohagad Fort Murder News: लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची ए टू झेड इनसाइड स्टोरी समोर आली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरीने कॅफेमध्ये बसून केतनच्या हत्येचा भयानक कट कसा रचला, वाचा सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Lohagad Fort Murder News: केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी सियाच्या मोबाइल CDR मधून हादरवणारी माहिती समोर"
NDTV Marathi

- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Lohagad Fort Murder News:
लोहगड किल्ला परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आपल्या होणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रेयसी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण हत्याकांडाची 'A to Z' इनसाइड स्टोरी आणि महत्त्वाचे खुलासे सविस्तर जाणून घेऊया...

दिवाळी पार्टीत ओळख आणि लग्नाला नकार 

सिया गोयल हिचे केतन अग्रवाल या तरुणासोबत लग्न ठरले होते. पण सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. गेल्या वर्षी दिवाळीच्या एका पार्टीत सियाची ओळख चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी झाली आणि या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. केतनला आपल्या आयुष्यातून कायमचे संपवण्यासाठी सियाने चेतनच्या मदतीने हत्येचा भयानक कट रचला. घटनेच्या काही वेळ आधी त्यांनी एका कॅफेमध्ये भेट घेऊन हत्येचा प्लान आखला.

Advertisement

(नक्की वाचा : Pune Lohagad Case: 'ती' एक गोष्ट ओळखली असती तर केतनचा जीव वाचला असता; काय म्हणाले वडील विशाल अग्रवाल?)

6 महिने, 2000 हून अधिक फोन कॉल्स आणि साइन लँग्वेज (6 Months, 2000 Phone Calls and CCTV Clue)

6 महिन्यांत 2000 हून अधिक कॉल्स: आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या 6 महिन्यांपासून सातत्याने संवाद सुरू होता. पोलिसांनी कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) तपासला असता, दोघांमध्ये 6 महिन्यांत तब्बल 2004 फोन कॉल्स झाले असून 238 तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
भर उन्हात हुडी आणि मास्कचा संशय: लोहगड किल्ल्यावर कडक उन्हाळ्यात एक व्यक्ती हुडी, डोक्यावर कानटोपी आणि चेहऱ्यावर मास्क लावून फिरत होती. पोलिसांना या विचित्र पेहरावाचा संशय आला. सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता हा संशयित व्यक्ती (चेतन) आणि सिया एकमेकांशी साइन लँग्वेज म्हणजेच इशाऱ्यांनी संवाद साधत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.

(नक्की वाचा : Lohagad Fort: नरबळी ते भुतांचा वावर, 2000 वर्ष जुना लोहगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला का आहे?)

पहिल्यांदा फसला डाव, रचला सापाचा बहाणा (First Failed Attempt and Snake Drama)

लग्नाआधीच केतनचा गेम करण्याचा सियाचा विचार होता. 14 जून रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलून देण्याचा पहिला प्रयत्न केला होता. पण त्यावेळी तिचा डाव फसला. केतन बचावल्याचे पाहताच सियाने प्रसंगावधान राखून साप दिसला असा खोटा आरडाओरडा केला. सापाला घाबरून मागे सरकताना चुकून धक्का लागल्याचा बहाणा तिने केतनसमोर केला होता.

Advertisement

बाली येथील फोटोशूट रद्द करण्यासाठी पासपोर्ट फाडला (The Bali Photoshoot Sabotage)

फुड मॉलच्या बाथरूममध्ये विल्हेवाट: 4 जून रोजी केतन आणि सियाचे बाली (Bali) येथे प्री-वेडिंग फोटोशूट होणार होते. पण सियाला केतनसोबत जायचे नव्हते. मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना एका फुड मॉलवर थांबून सियाने गुपचूप केतनच्या बॅगमधून त्याचा पासपोर्ट चोरला. त्यानंतर तिने लेडीज बाथरूममध्ये जाऊन तो पासपोर्ट फाडला आणि कमोडमध्ये फ्लश करून टाकला.

लोहगडचा धरला हट्ट: पासपोर्ट गहाळ झाल्यामुळे बालीचा दौरा रद्द झाला. यानंतर सियाने मुद्दाम फोटोशूट आणि फिरण्यासाठी महाबळेश्वर किंवा इतर सुरक्षित ठिकाणांऐवजी लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट केतनकडे धरला, कारण तिची हत्येची पूर्ण तयारी लोहगड येथे झाली होती.
 
सूनेच्या वाढदिवसासाठी महाबळेश्वरमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 70 रुम केले बुक (Grand Birthday Preparation Cut Short)

Advertisement

20 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या सूनेचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी केतनच्या वडिलांनी (सियाच्या होणाऱ्या सासऱ्यांनी) महाबळेश्वरमधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 70 रुम बुक केले होते. संपूर्ण कुटुंब या आनंदाच्या तयारीत असतानाच सिया आणि चेतनने त्याआधीच केतनला लोहगडवरून ढकलून त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलीस आता दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.