महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे महिलांवरिल अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे गुन्हा करणाऱ्या आरोपींना कायद्याचा धाक राहीला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच आरोपी गुन्हा करताना मागचा पुढचा विचार न करता बिंधास गुन्हे करत आहेत. असाच एक धक्कादायक गुन्हा कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इचलकरंजी शहरात एक विवाहीत महिला राहाते. तिला 1 वर्षाची मुलगी आहे. या मुलीला ठार मारेन अशी धमकी एक तरुणाने आणि त्याच्या बापाने दिली होती. त्या पैकी एकाने या महिलेवर तिला धमकी देवून अत्याचार केले. तर दुसऱ्याने तिचा विनयभंग केला. इचलकरंजीमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Dhule News: अनधिकृत कॅफेत पडद्याआड तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, पोलीस पोहोचले अन्...
संशयित आरोपी हे बाप-लेक आहेत. ते दोघेही पीडितेच्या घरी जाऊन तिच्या एक वर्षीय मुलीला ठार मारण्याची धमकी देत होते. त्यानंतर त्या विवाहीत महिलेवर लैंगिक अत्याचार करत होते असं या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याघटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय महिला खरोखर सुरक्षित आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. आरोपींना कडक शिक्षा केली जावी अशी मागणी पिडीत महिलेने केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world