बदलापुरातील प्रकरण ताजं असताना कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील शिये येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसात याविरोधात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे या मुलीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केलं आहे. आरोपी हा मुलीच्या आईच्या वाहिनीचा भाऊ असून नात्याने मामा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी 9 cctv फुटेज तपासल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिनेशकुमार सहा असं आरोपीच नाव आहे. सिपीआर रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या उपस्थितीत पीडित मुलीची इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करून पोटात लाथा बुक्क्या घातल्या होत्या. त्यानंतर गळा आवळून तिचा खून करण्यात आला.
बुधवारी रात्रीपासून मुलगी बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास घराजवळील असलेल्या शेतात तिचा मृतदेह सापडला. पीडित मुलीच कुटुंब परप्रांतीय आहेत . MIDC मध्ये कामाला गेले असताना पीडित मुलीबाबत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी SIT नेमली असून आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करून कठोर शिक्षा होईल याचा प्रयत्न असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती दिली.