
कार चालवत असतानाच चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चालकाचा कारवरून ताबा सुटला. त्यानंतर त्या कारने एका मागून एक 10 गाड्यांना धडक दिली. या अपघातात कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कोल्हापुरात खळबळ उडाली. 15 मार्च रोजी पहाटे हा अपघात झाला. धिरज पाटील असं मृत चालकाचे नाव असून त्यांचे वय 55 वर्ष होते. कोल्हापुरातले प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी उड्डाणपूलनजीकच्या सर्व्हिस रोडला हा अपघात झाला. पहाटे दोन वाजताच्या सुमारास एक इलेक्ट्रिक कार बिएसनल टॉवरकडून टाकळा परिसराकडे येत होती. घटनास्थळी शेजारीच असलेल्या दुमजली घरातील सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण अपघात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार सुमारे 100 ते 120 इतक्या वेगाने ही कार धावत होती असा अंदाज आहे
भरधाव वेगातील या कारने काही क्षणात एक ऑटोरिक्षा, एक कार, एक दुचाकी आणि इतर अनेक वाहनांना धडक दिली. धडक दिल्यानंतर आगीच्या ठिणग्या उडाल्याचंही पाहायला मिळालं. अपघाताची दृश्य पाहता, चालकाला या वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनुसार चालकाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.
बदललेली जीवनशैली आणि खाणपिणं यामुळे हृदयविकराच्या अनेक घटना समोर येत असतात. यामध्ये वाहन अपघातात अनेकजणांचा मृत्यू देखील झालाय. कोल्हापुरातल्या या अपघातावरून असंच दिसतं की धक्का सहन न होणं हे जीवावर बेतू शकतं. त्यामुळेच अपघाताच्या निमित्ताने हृदयविकाराविषयी काळजी घेणं हे आवश्यक आहे. या अपघातानंतर कोल्हापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world