जाहिरात

Kolkata Doctor Case: 17 ऑगस्टला देशभरातील डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, IMA ची घोषणा

कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येनंतर आयएमएने म्हटलं की, रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्यासोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा.

Kolkata Doctor Case: 17 ऑगस्टला देशभरातील डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, IMA ची घोषणा
Kolkata RG Kar Hospital Rape Case

कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरसोबत अत्याचार आणि हत्या केल्यावर देशभरात निषेध आणि आंदोलने सुरु आहेत.  इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 17 ऑगस्ट रोजी 24 तास देशव्यापा बंदची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद असतील. डॉक्टरांनी एका निवेदनात नमूद केले आहे की, अत्यावश्यक सेवा सुरू असतील. ओपीडी सेवा बंद असतील आणि काही शस्त्रक्रिया देखील बंद ठेवल्या जातील. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येनंतर आयएमएने म्हटलं की, रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्यासोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा. इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस अनिल कुमार जे नायक यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, "आमची मागणी आहे की रुग्णालये सेफ झोन घोषित करावेत. तसेच रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करावी. रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या 60 टक्के डॉक्टर आणि परिचारिका महिला आहेत."

(नक्की वाचा-  महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, हायकोर्टानं दिला आदेश)

डॉक्टरांची संघटना फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) ने कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या तोडफोडीच्या निषेधार्थ संपावर जाण्याची घोषणा केली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात FORDA ने यापूर्वीही दोन दिवस संप केला होता.

( नक्की वाचा : बायको ओरडत होती, पण नवऱ्यानं ऐकलं नाही...बाईकला बांधून फरफटत नेलं ! Video Viral )

मात्र, सरकारशी झालेल्या चर्चेनंतर संप मिटवण्यात आला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संपादरम्यान बुधवारी रात्री काही लोकांनी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केली. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com