कोपर्डीमध्ये दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल

कोपर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अहमदनगर:

कोपर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही वर्षांपूर्वी याच कोपर्डीतून एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्यानंतर तीन जणांनी तिच्यावर बलात्कार करून निघृणपणे हत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता कोपर्डीतील एका दलित तरुणाच्या आत्महत्या प्रकार उघडकीस आला आहे. 

विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे या दलित तरुणाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपुर्वी चिठ्ठीत लिहिलेल्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लोकसत्ता वृत्तपत्राने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आधारावर दिली आहे. 

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, कोपर्डी येथील भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बुधवारी गावात तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं. गावातच हरणवस्ती येथे राहणारा तरुण नितीन शिंदे हा तमाशादरम्यान व्यासपीठावर नाचत होता. यावेळी काही जणांनी त्याला हटकलं आणि मारहाण केली. यानंतर तमाशात गोंधळ उडाला आणि तमाशा बंद पडला. त्यानंतर शिंदे घरी जात असताना त्याला विवस्त्र करण्यात आलं आणि मारहाण केली. त्यांचा मोबाइलही हिसकावून घेतला. त्याने घरी निरोप पाठवल्यानंतर त्याचे नातेवाईक कपडे घेऊन आले व त्याला घरी घेऊन गेले. 

नक्की वाचा - धावत्या लोकलमध्ये 2 गटांत जोरदार राडा, प्रवाशाला गमवावा लागला जीव

या घटनेनंतर गुरुवारी दुपारी नितीन शिंदे याने घरातच आत्महत्या केली. याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे यांच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत गावातील काही तरुणांच्या नावांचा उल्लेख आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world