जाहिरात

Latur Crime: फ्रेशर्स पार्टीत घात... चौघांनी बेदम मारलं, कोमात असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Latur Crime:  डीएमएलटी प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांवर चौघा तरूणांनी काठीने हल्ला करून एका विद्यार्थ्यास गंभीररित्या जखमी केले आहे. 

Latur Crime: फ्रेशर्स पार्टीत घात... चौघांनी बेदम मारलं, कोमात असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

त्रिशरण मोहगावकर, लातूर

लातूर: लातूर जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर शिरकाव करत असतल्याचं पहायला मिळत आहे. गाडी पार्किंग करण्यावरून कत्तीने वार करणे,  यासारखे क्षुल्लक कारणावरून जीवे मारण्याचे अनेक प्रकार घडताना दिसून येत आहेत असाच एक प्रकार लातूरच्या जीवनरेखा महाविद्यालयातील फ्रेशर पार्टीमध्ये पाहायला मिळाला. नाचतेवेळी एकमेकांना धक्का लागला आणि यावरून वाद झाला यामध्ये सुरज शिंदे नावाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, लातूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या  बीसीए महाविद्यालयात  फ्रेशर्स पार्टी आयोजीत करण्यात आली होती. या दरम्यान सर्व विद्यार्थी या पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी डीएमएलटी प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांवर चौघा तरूणांनी काठीने हल्ला करून एका विद्यार्थ्यास गंभीररित्या जखमी केले आहे. 

त्यानंतर या महाविद्यालयाशेजारीच रिहान शेख, इरफान पठाण रा. चौधरी नगर लातूर व त्यांच्यासोबत इतर दोघेजन यांनी विद्यार्थी सूरज धोंडीराम शिंदे रा. प्रगती नगर लातूर यास काठीने मागील भांडणाची कुरापत काढून गंभीररित्या जखमी केले.  सूरज शिंदे हा  कोमात होता त्याचा उपचारादरम्यान लातूरच्या एका खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला. 

MP News: अपहरण केलं, बेदम मारलं, लघवीही पाजली; क्षुल्लक कारणावरून तरुणासोबत काय घडलं?

या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांत सूरज शिंदे याचा मित्र आदित्य याने दिलेल्या तक्रारीवरून रिहान शेख, इरफान पठाण यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणासाठी हाणामारीचा असा गंभीर प्रकार होणे यावरून लातूर शहरात शिक्षणासाठी असलेल्या पाल्यांविषयी पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते. शिक्षण घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांचा कल हा लातूर शहरामध्ये पाहायला मिळतो मात्र मागील काही दिवसांपासून लातूरमध्ये वाढत चाललेल्या गुंडगिरीमुळे यावर परिणाम होईल का असे बोलले जात आहे. अकरावी बारावी साठी राज्यभरातून विद्यार्थी लातूर मधील महाविद्यालयात प्रवेश घेतात मात्र असे गंभीर प्रकार समोर येताना दिसत आहेत यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली पंजाबचे DGP अडकले; पत्नीवरही गुन्हा दाखल

दरम्यान,  गुन्हे करणाऱ्यांवर मात्र पोलीसांचा आणि कायदयाचा वचक राहीला नसल्याचं बोललं जात आहे. तर सामान्यांवर होणाऱ्या पोलीसांच्या अत्याचाराचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याने शिक्षणाचा लातूर पॅटर्ण संपुन गुन्हेगारीचा लातूर पटर्ण निर्माण होतो की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com