जनावरांची चोरी करणारा एक चोरटा अनेक वर्ष पोलिसांच्या रडारवर होता. पण तो नेहमी पोलिसांनी चकवा देत होता. शिवाय जनावरे चोरण्याचा त्याचा सपाटा सुरूच होता. मात्र तो अडीच वर्षानंतर पोलिसांच्या नजरेत पडला. पण चोरट्याने चक्क गटाराचा सहारा घेतला. पोलिसांना पाहाताच तो गटारात असा काही लपला की तिथे कुणी लपले आहे, असं कुणाला वाटणारही नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याची अशी काही धुलाई केली की त्या धुलाईची चर्चा संपूर्ण लातूरमध्ये होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही महिन्यांपासून उदगीर परिसरात जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत पोलिसांनाही तक्रार करण्यात आली होती. पोलिसांना ही हा चोर हवा होता. त्याचं नवा अशोक आहे. तो उदगीरमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार उदगीर शहरात पोलिसांनी सापळा रचला होता. रेल्वे स्टेशन भागात तो दिसल्याचंही पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांच्या तुकड्या रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या.
पोलिसांना पाहाताच अशोक या चोराने नामी शक्कल लढवली. तो जवळच असलेल्या गटारात लपला. सर्व शरीर त्याने गटाराच्या चिखलात लपवलं. चेहरा फक्त बाहेर ठेवला. पोलिसांनी त्याला पाहिले. त्यानंतर पोलिस त्याच्या दिशेने गेले. त्यावेळी त्याने पोलिसांवर गटारातील घाणेरडा चिखल फेकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस तिथून काही हटले नाहीत. शेवटी त्यांनी त्या चोराला अलगत गटाराच्या बाहेर काढले. त्यावेळी तो घाणेरड्या चिखलाने माखला होता.
ट्रेंडिंग बातमी - Cyber crime: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जेष्ठ नागरिकाला 3 कोटींचा गंडा
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही तो पळून जाण्यासाठी धडपड करत होता. पण त्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. मात्र त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस स्टेशनकडे नेण्या आधी त्याला गाडी धुण्याच्या वॉशिंग सेटरवर नेण्यात आले. तिथे त्याची पोलिसांनी पाण्याने धुलाई केली. त्याच्या अंगावरचा चिखल साफ करण्यात आला. त्यावेळी अनेक जण त्या ठिकाणी जमा झाले होते. पोलिस असं का करत आहे याचा विचार ते करत होते. पण ज्यावेळी खरे प्रकरण लोकांना समजले त्यानंतर सर्वांनीच पोलिसांचे कौतूक केले. दरम्यान चोरी केलेली जनावरे तो कुणाला देत होता याची चौकशी आता पोलिस करत आहेत.