Latur News: पती करत होता दुसऱ्या महिलेसोबत चॅट, पत्नीने घातला आत्महत्येचा घाट, पुढे जे घडलं ते...

आरतीने पुन्हा वडीलांना फोन केला. शिवाय मारहाण केल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर वडील तसेच आरतीच्या घरी धावत गेले.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लातूर जिल्ह्यातील वरवंटी शिवारात नवविवाहितेने पतीच्या छळामुळे आत्महत्या केली
  • पती रामेश्वर उरगुंडेने पत्नी आरतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक छळ करत होता
  • पत्नीने पतीचे दुसऱ्या महिलेशी चॅटिंग पकडले. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
लातूर:

त्रिशरण मोहगावकर 

एकीकडे पत्नीच्या चारित्र्यावर पती संशय घेत होता. त्यातून तिचा छळ सुरू होता. पण दुसरीकडेच तोच पती दुसऱ्या महिलेसोबत सुत जुळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी पतीची ही चोरी पत्नीने पकडली. त्यानंतर जे काही घडले त्याने संपूर्ण लातूर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेनंतर सर्वच जण आवाक झाले आहे. पतीला रंगे हात पकडल्यानंतर पत्नीला राग अनावर झाला होता. आपली चुक नसताना आपल्यावर संशय घेतला जात होता. त्याच वेळी पती मात्र दुसरीकडेच दुसऱ्या बाई सोबत नको ते कारनामे करत होता. हे सहन न झाल्याने या तरुण विवाहीतेने अखेर टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक मानसिक छळ करणाऱ्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत सुरू असलेले चॅटिंग सापडले. त्यामुळे राग अनावर झालेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूर जवळील वरवंटी शिवारात घडली आहे. तर आरोपी पतीसह सासऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती रामेश्वर उरगुंडे ही रायवाडीची मुळ रहिवाशी होती. ती लग्नानंतर लातूरच्या वरवंटी इथं राहात होती. आरती हिचा विवाह रामेश्वर  उरगुंडे यांच्याशी 7 मे 2023 रोजी झाला होता. लग्नाच्या एक वर्षानंतर रामेश्वर हा आरतीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातून तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला. 

नक्की वाचा - Latur News: पैशाची हाव, हत्येचा बनाव! एक चुक नडली अन् भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश

आरतीने कोणतीही गोष्ट मागितली तर माहेराहून घेऊ नये असे तिला सांगायचा. वारंवार तिच्या चारित्र्यावरून तिला दुषणे दिली जात होती. शिवाय मारहाणही केली जात होती. शुक्रवारी आरती हिला रामेश्वर याच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचे मेसेज सापडले. याचा जाब तिने रामेश्वर याला विचारला. त्यावर रामेश्वरने तिला तुला काय करायचे ते करून घे असे सांगितलं. शिवाय. तिला मारहाण केली. झालेली बाब तिने आपले वडील राजेंद्र दरेकर यांना सांगितलं. त्यानंतर वडील तिच्या घरी आले. त्यांनी दोघांचीही समजूत काढली. आरतीचे वडील तिथून काही अंतरावरच गेले. त्यानंतर तिला पतीने पुन्हा मारहाण सुरू केली. 

नक्की वाचा - Shocking news: शरीरसंबंध ठेवताना प्रियकराची 'ती' गोष्ट समजली, विवाहीत प्रेयसी भडकली अन् थेट गुप्तांगचं कापलं

आरतीने पुन्हा वडीलांना फोन केला. शिवाय मारहाण केल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर वडील तसेच आरतीच्या घरी धावत गेले. त्यावेळी आरतीने स्वत: ला एका रूममध्ये कोंडून घेतले होते. तर बाहेरून तिचा पती रामेश्वर कुऱ्हाडीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी छोट्या फटीतून राजेंद्र दरेकर यांनी घरात पाहिले असता आरतीचे पाय लटकत असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून पाहिले तर आरती ही पंख्याला लटकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर राजेंद्र दरेकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत जावई रामेश्वर उरगुंडे आणि आरतीचा सासरा सिद्धेश्वर उरगुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Buldhana News: 'मी जिवंत आहे', वृद्ध आईची आर्तहाक, पण पोटच्या गोळ्याने केला घात, चक्क जन्मदात्या आईसोबतच...

दरम्यान लातूरच्या चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील तलावात गणपती विसर्जन पाँईट जवळ दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले असता एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह असल्याने चर्चेचा विषय ठरला. तर दोघेही नळेगाव येथील रहिवाशी असल्याने चर्चांना उधाण आले होते. महिला घरकाम करून उदरनिर्वाह करत होती. पुरुष विट भट्टीवर कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या मृत्युचे कारण स्पष्ट नसले तरी प्रेम प्रकरण असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा आहे.