चित्रपट अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी (threat from Lawrence Bishnoi Gang) देण्यात आली आहे. 7 नोव्हेंबरला रात्री मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करून सलमान खानला धमकी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप धमकी देणाऱ्याची ओळख पटू शकलेली नाही. गेल्या काही दिवसात सलमान खान याला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाकडे सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या धमकीत सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात मंदिरात जाऊन माफी मागणे आणि पाच कोटींची मागणी करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिष्णोई गॅगकडून धमकी वजा मेसेज देण्यात आला आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला हा मेसेज आला आहे. गुरूवारी रात्री 12 च्या सुमारास हा धमकी वजा मेसेज आला आहे.
नक्की वाचा - 7 कोटी 80 लाख कुणाचे? रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचं काम, पोलिसांची मोठी कारवाई
धमकीमध्ये काय लिहिलंय?
'सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यावर एक गाणं लिहिण्यात आलं आहे. एका महिन्याच्या आत हे गाणं लिहिणाऱ्याला मारून टाकलं जाईल. गाणं लिहिणाऱ्याची अशी अवस्था करण्यात येईल की तो आपल्या नावाने कधीच गाणं लिहू शकणार नाही, असं या धमकीत लिहिलं आहे. जर सलमानमध्ये हिम्मत असेल तर तो त्याला वाचवेल. या प्रकरणात मुंबईच्या वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी आलेल्या नंबरचा शोध घेतला जात आहे. मात्र हे गाणं कुठलं आहे आणि कोणी लिहिलं, याबाबतची माहिती धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आलेली नाही.