जाहिरात

Nagpur Jail : नातेवाईकांनी बोलणं टाळलं, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने अंडरवेअरने स्वत:ला संपवलं

मृत कैद्याचे नाव तुळशीराम शिंदे असून, 2014 मध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांनी त्याला खूनाच्या आरोपाखाली अटक केली होती.

Nagpur Jail : नातेवाईकांनी बोलणं टाळलं, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने अंडरवेअरने स्वत:ला संपवलं

Nagpur Central Jail News : नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 54 वर्षीय कैद्याने (Prisoner Suicide) अंडरवेअरच्या इलॅस्टिकचा वापर करून खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. नागपूर जेलमध्ये कपड्यांच्या साहाय्याने आत्महत्या करण्याची किंवा प्रयत्न करण्याची ही गेल्या चार वर्षांतील तिसरी घटना असून  कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

मृत कैद्याचे नाव तुळशीराम शिंदे असून, 2014 मध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांनी त्याला खूनाच्या आरोपाखाली अटक केली होती. 2016 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोविड काळात कारागृहांतील गर्दी टाळण्यासाठी सरकारने तात्पुरत्या सुटकेची सवलत दिली होती. याच पार्श्वभूमीवर शिंदे यालाही काही काळासाठी जेलमधून बाहेर जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, नंतर पुन्हा त्याला अटक करून सेंट्रल जेलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याने पॅरोल आणि फर्लोसाठी अर्ज केला, पण त्याला नकार देण्यात आला.

Nashik Accident : नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर भीषण अपघात, अल्टो कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यू

नक्की वाचा - Nashik Accident : नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर भीषण अपघात, अल्टो कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यू

मृत्यूपूर्वी शिंदे याला बारक क्रमांक चार जवळील रंगकामाच्या गोदामात काम देण्यात आले होते. तेथेच त्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची दंडाधिकारी चौकशी सुरू असल्याची माहिती नागपूर सेंट्रल जेलचे अधीक्षक वैभव आगे यांनी दिली आहे. तुळशीराम शिंदे याचा कोणत्याही कुटुंबीयांशी संपर्क नव्हता असे प्राथमिक तपासात उघड झालं आहे.  जेलमधून घरी फोन करण्याची परवानगी असतानाही त्याचे नातेवाईक त्याच्याशी बोलत नव्हते. त्यामुळे तो नैराश्यात गेला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. 2023 मध्ये कैदी शामराव शिंदे याने पायजम्याचा वापर करून आत्महत्या केली होती. तर 2021 मध्ये आरोपी रोशन शेख याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. या घटनांनी कारागृहातील सुरक्षेचा, कैद्यांच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापनाचा आणि मानवी संवेदनांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com