
उत्तर प्रदेशची राजधानी लखऊनमधून एक अत्यंत लज्जास्पद आणि अमावीय घटना समोर आली आहे. येथे एका ७० वर्षीय दलित वृद्धाला धमकावण्यात आलं, इतकच नाही तर त्याच्यासोबत अत्यंत भयावह कृत्य केलं आहे.
आजारी वृद्धासोबत अमानवीय कृत्य
ही घटना लखनऊच्या एका मंदिर परिसरातील आहे. पीडित ७० वर्षीय दलित वृद्ध रामपालने पोलिसांकडे तक्रारीत म्हटलं, त्याला श्वासोच्छवासाचा त्रास आहे. त्याला वारंवार लघवीला जावं लागतं. यादरम्यान चुकून त्याने मंदिर परिसरात लघवी केली. आरोप आहे की, स्वामीकांत उर्फ पम्मू नावाची एक व्यक्ती त्याच्यावर संतापली आणि त्याला जातीवाचक शिव्या देऊ लागला. धमकी देत त्याला स्वत:ची लघवी चाटायला लावली. यानंतर त्याने मंदिर परिसरातील जमीन पाण्याने धुतलं. जमीन अपवित्र झाल्याचं सांगत त्याचं शुद्धीकरण केलं.
जातीवाचक शिवीगाळ...
वृद्ध रामपालचा आरोप आहे की, त्या व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्याला धमकावलं. या घटनेमुळे समाजातील जाती जातींमधील भेदभाव आणि हेकेखोर मानसिकता दाखवते.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
पीडित दलित वृद्ध रामपाल यांच्या तक्रारीनंतर लखऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएस कलम ११५ (२), ३५२, ३५१ (३) सह एसटी/एससी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world