
पहलगाममधील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terrorist attack) आणि ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारतामध्ये काम करत असलेलं पाकिस्तानी हेरांचं नेटवर्क उघड होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाकिस्तानच्या हेरांना (Pakistani Spy) अटक करण्यात आली आहे. आता ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई करत 3 पाकिस्तानच्या हेरांना अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) च्या संपर्कात असल्याचा आणि भारत सरकारने प्रतिबंधित केलेली संवेदनशील व गोपनीय माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केल्याचा आरोप आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क
तपासात समोर आले आहे की, या तरुणाचा नोव्हेंबर 2021 मध्ये फेसबुकद्वारे एका पाकिस्तानी गुप्तहेर एजंटशी संपर्क झाला होता. त्यानंतर, नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान, त्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गोपनीय आणि संवेदनशील प्रादेशिक माहिती पाठवली होती.
( नक्की वाचा : ज्योती मल्होत्राचा थेट होता ISI शी संपर्क, पाकिस्तानात AK 47 घेऊन... नव्या Video मधून अनेक रहस्य उघड )
गुन्हा दाखल
या प्रकरणात तीन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे एटीएस युनिटने या सर्वांवर गुप्तचर अधिनियम 1923 च्या कलम 3(1)(अ), 5(1) आणि बीएनएसच्या कलम 120(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांकडून दहशतवादाशी संबंधित पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world