'मी आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे', ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या भामट्याला बेड्या

Dombivli Crime News : विजय तांबे याच्या विरोधात 50 हून जास्त फसवणूक करुन लुटीचे गुन्हे दाखल आहेत. असाध्य आजार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून तो जामीनावर सुटतो आणि सुटून आल्यावर तो पुन्हा लोकांना बतावणी करुन लूटतो, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, डोंबिवली

मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे, असं सांगून डोंबिवलीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली विष्णूनगर पोलिसांनी विजय तांबे या भामट्याला नवी मुंबई खारघरहून अटक केली आहे. विजय तांबे याच्या विरोधात 50 हून जास्त फसवणूक करुन लुटीचे गुन्हे दाखल आहेत. असाध्य आजार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून तो जामीनावर सुटतो आणि सुटून आल्यावर तो पुन्हा लोकांना बतावणी करुन लूटतो, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोंबिवलीतील महात्मा फुले रोड परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात विजय तांबेविरोधात तक्रार केली होती. त्याने पोलिसांना सांगितले की, मला रस्त्यात एक व्यक्ती भेटली. त्याने सांगितले की, मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे. मी तुम्हाला त्या दिवशी आमदारांसोबत भेटलो होतो. 

काका त्याच्या या बोलण्यानंतर आठवत होते की, मी याला नक्की कधी भेटलो. इतक्यात त्याने आजोबांकडील दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. आजोबा बँकेतून नुकतेच बाहेर पडले होते. त्याच वेळी ही घटना घडली. 

(नक्की वाचा- कुंभे धबधब्यावर रिल स्टार गेली, पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळली, पुढे काय झालं?)

अशीच एक तक्रार डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात देखील दाखल झाली होती. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिग्विजय भवार यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. ज्या ठिकाणी आजोबांना बतावणी करुन लुटले गेले, तेथीस सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले. 

Advertisement

अटकेआधी काही तास दोघांना लुटले

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला. तो घरी सापडला नाही. ज्येष्ठ नागरिकांना लुटणारा हा व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी काही दिवसात त्याला खारघर येथून अटक केली. अटक होण्याआधी त्याने दोन वयोवृद्धांना लूटले होते. विजय तांबे याने अटक झाल्यानंतर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. विजय तांबे याला असाध्य आजार आहे. त्या आजाराचे त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. न्यायालयात तो ते प्रमाणपत्र दाखवून सहानुभूती मिळवतो.

(नक्की वाचा - तलाक, तलाक, तलाक! 'या' देशाच्या राजकुमारीनं Instagram वरुन दिला नवऱ्याला घटस्फोट)

याच आधारे त्याला न्यायालयाकडून जामीन मिळतो. जामीनावर सुटून आला की तो पुन्हा लोकांना गंडा घालण्याचे काम करतो. यावेळी पोलीस त्याला न्यायालयात हजर करताना सर्व परिस्थिती कथन करणार आहेत. जेणेकरुन त्याला पुन्हा जामीन मिळू नये. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना त्याने गंडा घातला आहे. 
 

Advertisement

Topics mentioned in this article