जाहिरात

Kalyan News: कल्याणमध्ये सैराटची पुनरावृत्ती? आंतरजातीय लग्नावरुन काका संतापले,माय-लेकांवर घरात घुसून हल्ला!

Kalyan News:  कल्याणमध्ये आंतरजातीय विवाहाच्या रागातून रक्ताच्या नात्यानेच रक्ताचा सडा सांडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये सैराटची पुनरावृत्ती? आंतरजातीय लग्नावरुन काका संतापले,माय-लेकांवर घरात घुसून हल्ला!
Kalyan News: जखमी अवस्थेतील माय-लेकांना तातडीने कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई:

Kalyan News:  कल्याणमध्ये आंतरजातीय विवाहाच्या रागातून रक्ताच्या नात्यानेच रक्ताचा सडा सांडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पुतण्याने दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न ठरवले, याच कारणावरून संतापलेल्या काकांनी पुतण्यावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या स्वतःच्या वहिनीवर जीवघेणा हल्ला केला. रविवारी ज्या घरात सनई-चौघडे वाजणार होते, त्याच घरात आज रक्ताचे डाग आणि पोलीस तपासाचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणाचे येत्या रविवारी लग्न होणार होते. घरात आनंदाचे वातावरण होते आणि लग्नाची लगबग सुरू होती. मात्र, हे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी होत असल्याने कुटुंबातील काही सदस्य, विशेषतः काका नाराज होते. याच नाराजीचे रूपांतर भीषण वादात झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात असलेल्या काकांनी आपल्या सख्ख्या पुतण्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.

( नक्की वाचा : Kalyan News: बॅगेत काहीच नाही, मग गांजा गेला कुठे? महिला पोलिसांच्या तपासणीत धक्कादायक गुपित उघड )
 

आईवरही निर्दयीपणे लाथा-बुक्क्यांनी प्रहार

काका एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तीक्ष्ण हत्याराने पुतण्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईमध्ये पडली असता, त्यांनाही कोणतीही दया आली नाही. आरोपीने आपल्या वहिनीलाही अत्यंत निर्दयीपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात माय-लेक दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हल्ल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. जखमी अवस्थेतील माय-लेकांना तातडीने कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नाच्या तोंडावर घडलेल्या या हिंसक घटनेमुळे पीडित तरुण आणि त्याचे कुटुंब सध्या मोठ्या मानसिक धक्क्यात आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: आधी अपहरण आता मारहाण! डोंबिवलीतील RPI नेत्यांचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला! प्रकरण काय? )

आंतरजातीय विवाहावरून हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आजच्या आधुनिक काळातही आंतरजातीय विवाहावरून अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले होणे ही चिंतेची बाब आहे. एका बाजूला प्रगतीशील महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला जातीपातीच्या भिंती अजूनही घराघरांमध्ये किती घट्ट आहेत, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपी काकांचा शोध सुरु आहे. त्याचबरोबर या हल्ल्यामागे आंतरजातीय विवाहाचा राग हे एकच कारण आहे की अन्यही गोष्टीही कारणीभूत आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com