Rajasthan News: आधार कार्डवरील नावातील चुकीमुळे एका विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. दानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालरा पाडा गावातील रहिवासी असलेल्या विद्यार्थिनी पूजाला (कागदपत्रामध्ये वेगवेगळे नाव) कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यात अडचणी येत होत्या. तिच्या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये नावाचे स्पेलिंग किंवा नाव वेगळे असल्याने ही समस्या निर्माण झाली होती. तिच्या मार्कशीटवर योग्य नाव होते, पण आधार कार्डमध्ये नाव चुकीचे असल्याने तिला कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. ही चूक दुरुस्त करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, पण त्यात यश न आल्याने तिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
मार्कशीटवर नाव 'पूजा', पण आधार कार्डवर नाव 'उषा'
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिच्या आधार कार्डवर 'उषा' असे नाव आहे, तर इतर शैक्षणिक कागदपत्रांवर 'पूजा' या नावाची नोंद आहे. दोन्ही कागदपत्रांवर वेगवेगळी नावे असल्याने कॉलेज प्रशासनाने प्रवेश देण्यास नकार दिला.
ई-मित्र केंद्रात मारल्या कित्येक फेऱ्या
विद्यार्थिनी गेल्या अनेक दिवसांपासून ही चूक दुरुस्त करण्यासाठी ई-मित्र केंद्रांच्या चकरा मारत होती, पण प्रत्येक वेळी तिला निराशाच पदरी पडली. सततच्या धावपळीमुळे आणि अभ्यासाचे नुकसान होत असल्याच्या चिंतेमुळे ती मानसिक तणावाखाली होती. याच तणावातून तिने विषारी औषध सेवन केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

Photo Credit: NDTV Marathi
(नक्की वाचा: Beed News: "ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याच्याकडून खरेदी टाळा"; लेन्सकार्ट शोरूमविरोधात हिंदू संघटनेचा आक्रमक)विद्यार्थिनीची परिस्थिती गंभीर, उपचार सुरूही घटना घडताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. तातडीने तिला रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला बांसवाडा येथील एमजी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world