जाहिरात

Marriage Fraud: मॅट्रिमोनिअल साइटवर हाय-प्रोफाइल थाट! 4 लग्ने, 5 मुलांचा बाप, 'लुटारु नवरा' कसा अडकला?

Marriage Fraud: एकीकडे मॅट्रिमोनिअल साइटवर स्वतःला उच्च अधिकारी म्हणून भासवायचं आणि दुसरीकडे महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करायची, असा त्याचा धंदा होता.

Marriage Fraud: मॅट्रिमोनिअल साइटवर हाय-प्रोफाइल थाट! 4 लग्ने, 5 मुलांचा बाप, 'लुटारु नवरा' कसा अडकला?
Marriage Fraud: लग्नाच्या पवित्र बंधनाला फसवणुकीचं हत्यार बनवणाऱ्या एका व्यक्तीची ही कथा आहे.
मुंबई:

Marriage Fraud: एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकरण उघड झालं आहे, जे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. लग्नाच्या पवित्र बंधनाला फसवणुकीचं हत्यार बनवणाऱ्या एका व्यक्तीची ही कथा आहे. एकीकडे मॅट्रिमोनिअल साइटवर स्वतःला उच्च अधिकारी म्हणून भासवायचं आणि दुसरीकडे महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करायची, असा त्याचा धंदा होता.

काय आहे प्रकरण?

 गुजरातमध्ये राहणारा हा व्यक्ती छत्तीसगढमधील दुर्ग येथील एका शिक्षिकेशी लग्न करून फरार झाला, त्यावेळी ही घटना उघड झाली. विशेष म्हणजे, त्याने या शिक्षिकेला प्रेमाच्या नावाखाली तब्बल 45 लाख रुपयांचा चुना लावला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या 'लुटारु नवरदेवाला' बेड्या ठोकल्या आहेत. तो मॅट्रिमोनिअल साइटवर मोठा अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्याशी लग्न करायचा आणि नंतर त्यांची फसवणूक करून पसार व्हायचा.

( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )
 

कोण आहे हा लुटारु नवरा?

या आरोपीचं नाव बीरेन कुमार सोलंकी असून आणि त्याचं वय अंदाजे 55 वर्ष आहे. तो मूळचा गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. दुर्ग येथील एका 50 वर्षांच्या महिला शिक्षिकेशी त्याने आधी लिव्ह-इन-रिलेशनशिप आणि नंतर लग्नाचं नाटक करत तिच्याकडून अंदाजे 45 लाख रुपये उकळले. ही फसवणूक 2019 मध्ये सुरू झाली, जेव्हा पीडितेने एका मॅट्रिमोनिअल साइटवर बीरेनची प्रोफाइल पाहिली आणि त्याच्याशी संपर्क साधला.

बीरेनने त्या शिक्षिकेशी बोलताना तो अविवाहित असल्याचं खोटं सांगितलं. दोघांची चर्चा पुढे सरकल्यावर त्याने लग्नाचं वचन दिलं आणि लग्न होईपर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या शिक्षिकेने त्याला होकार दिला.

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )

लिव्ह-इन,लग्न आणि कोव्हिड-19 चं कारण

2019 ते 2023 या कालावधीमध्ये दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. बीरेन दुर्गमध्ये यायचा, तेव्हा तो त्या महिलेसोबत पती-पत्नीप्रमाणे राहायचा. महिला शिक्षिकाही अहमदाबादला जाऊन त्याच्यासोबत हॉटेलमध्ये थांबायची. ते दोघेही स्वतःला पती-पत्नी म्हणूनच इतरांना ओळख करून देत होते. पण कोव्हिड-19 महामारीमुळे त्यांचं लग्न सातत्याने पुढे ढकललं जात होतं.

अखेर 2023 मध्ये बीरेन दुर्ग येथे आला आणि दोघांनी येथील एका हॉटेलमध्ये विधीवत लग्न केलं. लग्नानंतर तो काही दिवस शिक्षिकेकडे राहिला आणि नंतर पुन्हा गुजरातला निघून गेला. त्यानंतर मात्र त्याने हळूहळू शिक्षिकेशी अंतर ठेवायला सुरुवात केली आणि त्यांचे फोन उचलणंही बंद केलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com