जाहिरात

MBBS Graduate Dies : आवडीने मांजर घरात आणली, MBBS तरुणीने गमावला जीव; आईला मोठा धक्का... नेमकं काय घडलं?

मांजरीवरुन कुटुंबात झालेल्या वादानंतर तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

MBBS Graduate Dies : आवडीने मांजर घरात आणली, MBBS तरुणीने गमावला जीव; आईला मोठा धक्का... नेमकं काय घडलं?

MBBS Graduate Dies : हैद्राबादमध्ये एक २३ वर्षांची MBBS डॉक्टरने कथितपणे आत्महत्या केली आहे. तिने नुकतच एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मांजरीवरुन कुटुंबात झालेल्या वादानंतर तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादच्या अलवाल भागात रिसाला बाजार परिसरात राहणारी २३ वर्षीय टी. प्रिन्सी उर्फ श्रेष्टाने नुकतच मेडिकल शिक्षण पूर्ण केलं होतं. एमबीबीएस केल्यानंतर ती पुढील शिक्षणाची तयारी करीत होती. सोबतच तिने मेडिकल लायसन्ससाठी अर्ज केला होता. 

काही दिवसांपूर्वी प्रिन्सीने मांजर आणली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सीने एक मांजर घरी आणली होती. यानंतर तिला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागला. यामुळे आई आणि प्रिन्सीमध्ये अनेकदा भांडण होत होतं. शुक्रवारीही मांजर ठेवण्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. यानंतर प्रिन्सीची आई कुसुमलता कामावर निघून गेली. त्यामुळे प्रिन्सी घरात एकटी होती. सायंकाळी जेव्हा कुसुमलता परतल्या तर प्रिन्सीने गळफास घेत आत्महत्या केली होती. 

नक्की वाचा - Pune News : पुण्यात हळदीतून नशा! उच्चभ्रू परिसरातील धक्कादायक प्रकार उघड, दोघांना अटक

मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईला धक्काच बसला. त्यांनी तातडीने शेजारच्यांना बोलावलं. पोलिसांना बोलावण्यात आलं आणि मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरुन संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात घरगुती वादाचं कारण समोर आलं आहे. मात्र पोलीस अन्य पैलूदेखील तपासून पाहत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com