Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाने आत्महत्या केली आहे. 11 व्या मजल्यावरून उडी घेत मनोरुग्णाने आपलं आयुष्य संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसंनी रुग्णाला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. विजय असं या मनोरुग्णाचं नाव आहे. तरुणानी यापूर्वी रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आज 25 सप्टेंबर रोजी त्याने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.