Vasai Crime : 3 महिन्यात 200 पुरुषांनी शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था

पीडित मुलीची लवकर पौगंडावस्था यावी यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी

Vasai Crime : अल्पवयीन बांगलादेशी मुलीवर 3 महिन्यांत 200 हून अधिक जणांकडून बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईत मानवी तस्करीतून सुटलेली 12 वर्षीय बांगलादेशी पीडितेने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. गुजरातमधील नडियाद येथे तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा खुलासा झाला आहे. MBVV पोलिसांच्या अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने, Exodus Road India Foundation आणि Harmony Foundation या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलीची सुटका केली आहे. 200 पैकी आतापर्यंत दहा नराधमांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

पीडित मुलीची लवकर पौगंडावस्था यावी यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिल्याचाही संशय...

वसईतून मानवी तस्करीच्या भीषण वास्तवाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वसईतील नायगाव येथे उघडकीस आलेल्या देहव्यापार रॅकेटमधून सुटलेल्या 12 वर्षीय बांगलादेशी मुलीने धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्यावर तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तिने सांगितलं. 26 जुलै रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने, Exodus Road India Foundation आणि Harmony Foundation या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या मुलीला या जाळ्यातून बाहेर काढलं.

नक्की वाचा - Pune News : सासरकडून छळ, पुण्यात आणखी एका विवाहितेचा बळी

बालसुधारगृहात दिलेल्या जबाबात पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिला प्रथम गुजरातमधील नडियाद येथे नेण्यात आले. जिथे तीन महिन्यांत तिच्यावर 200 हून अधिक पुरुषांनी अत्याचार केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.