महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच मतदार संघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका अल्पवयीन तरुणी सोबतच भयंकर प्रकार घडला आहे. ही तरुणी अवघ्या 14 वर्षांची आहे. ही तरुणी लग्ना आधीच गर्भवती झाली. हे समजल्यानंतर तिचं कुटुंबीयांनी तिचा बाल विवाह केला. ही बातमी संपूर्ण गावात झाली. पण हा बाल विवाह सरकारी यंत्रणांकडून रोखण्यात आला नाही. ज्यावेळी आशा सेविका रुटीन चेकसाठी त्या मुली पर्यंत पोहोचले त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवकासह महिला आणि बालविकास प्रकल्पाधिकारी यांनी कर्तव्यात या प्रकरणी कसूर केल्याचं ही यात समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळ्यात घडली आहे. म्हसळा तालुक्यातील आदिवासी वाडी कोळे येथे अल्पवयीन मुलगी राहते. तिथेच राहाणाऱ्या एका 20 वर्षाच्या तरुणामुळे ती गर्भवती राहीली. लग्ना आधीच ती गर्भवती झाली होती. याची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी त्याच मुला बरोबर तिचे लग्न ही लावून दिली. हा बालविवाह होता. याची माहिती संपूर्ण वाडीत झाली. पण प्रशासनाला या बालविवाहा बाबत काहीच समजले नाही. अल्पवयीन मुलगी ही केवळ 14 वर्षांची आहे.
आशा सेवीका या नेहमी आदिवासी पाड्यांवर रुटीन चेकअपसाठी जात असतात. शिवाय कुपोषणाची आकडेवारी, सद्य स्थिती याचाही त्या आढावा घेतात. त्या कामासाठी तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनिषा लोंढे या त्या आदिवासी पाड्यावर गेल्या होत्या. त्यावेळी ही तरुणी त्यांना दिसली. तिचे चेकअप केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समजले. पण तिचे वय 14 वर्ष असल्याचंही त्यांना लक्षात आलं. हा प्रकार त्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर संबंधितां विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तिच्या पतीला ही ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या विरोधात बाल लैंगिक अपराध कलमाद्वारे गुन्हा ही नोंदवला गेला.
आशा सेविकेच्या माध्यमातून सदर पीडीत मुलीची तपासणी आणि पिडीत बाधीत असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर ग्रामसेवक व आरोग्य विभागानाला जाग आली. त्यांनी पुढील कारवाई सुरु केली. बालविकास प्रकल्पाधिकारी म्हसळा यांनी अल्पवयात विवाह केल्याने, काय परिणाम होतात याबद्दलची माहिती मुलीच्या नातलगाना देणे कर्तव्य भावनेतून आवश्यक होते. परंतु प्रभारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचा आता आरोप होत आहे.
बालविकास प्रकल्पाधिकारी म्हसळा हे पद गेले 3 वर्ष रिक्त आहे. पर्यवेक्षिकाला या पदाचा कार्यभार दिला आहे. विशेष म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे तो महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचाच मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांच्यात मतदार संघात महिलांची अशी स्थिती असेल तर राज्यात काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.