Nashik Crime : इन्स्टाग्राम जीवघेणा ठरतोय? अल्पवयीन मुलीने राहत्या घरात घेतला गळफास

सोशल मीडियाचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर किती पातळीवर परिणाम होतो,  हे याचंच एक उदाहरण आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Nashik News : नाशिकच्या सिडको परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर किती पातळीवर परिणाम होतो,  हे याचंच एक उदाहरण आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या बदनामीतून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली. या मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. सातत्याने होणार त्रास सहन न झाल्याने या मुलीने स्वत:चा जीव संपवला. 

काय आहे प्रकरण? 

नाशिकमधील सिडको परिसरात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. इन्स्टाग्रामवर झालेली बदनामी आणि प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे 17 वर्षीय तरुणीने स्वत:चा जीव संपवला. 12 ऑगस्टला राहत्या घरात फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत तिने आत्महत्या केली. साडेपाच महिन्यांपासून प्रेमसंबंध ठेवण्यासाठी या मुलीला त्रास दिला जात होता. यामध्ये तीन जणांचा समावेश आहे. अंबड पोलीस ठाण्यात या तीन युवकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जण अटकेत आहेत. 

Topics mentioned in this article