
राजकीय जिवनात वावरताना नेत्यांना अनेक गोष्टींचा काळजी घ्यावी लागते. नाही तर जरा जरी कोणती गोष्ट घडली तर थेट नेत्याकडे बोट दाखवलं जातं. तसं पाहता नेते तशी काळजी घेतात. पण अनेक वेळ काही ना काही चूक ही राहातेच. त्यामुळे नेते मंडळींची अडचण मात्र वाढते. अशीच एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. इथं भाजप आमदाराचा एक कार्यकर्ता थेट चोर असल्याचं समोर आलं आहे. शिवाय त्याला रंगेहात पकडण्यात ही आलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून, मतदार संघात आमदाराचा चोर कार्यकर्ता याचीच चर्चा सुरू आहे.
सुभाष उर्फ राजेश प्रभाकर जाधव असं या चोराचं नाव आहे. तो भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचा कार्यकर्ता आहे. तो लोणीकर यांच्या अत्यंत जवळचा समजला जातो. त्याची मतदार संघात कट्टर समर्थक म्हणूनच ओळख आहे. पण आता त्याची दुसरी ओळख ही निर्माण झाली आहे. ती म्हणजे चोर असल्याची. काही दिवसांपूर्वी परतूर शहरातून एक दुचाकी चोरी गेली होती. त्याची रितसर तक्रा पोलिसात केली गेली होती. त्यानुसार पोलिस तपास करत होते.
त्याचा तपास पोलिसांकडून सुरु असताना या प्रकरणी परतूर तालुक्यातील लिंगसा याठिकाणाहून विष्णू दादाराव माने याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याने त्याचे साथीदार वैभव धरपडे आणि राजेश जाधव यांच्या मदतीने जिल्हाभरातून अनेक दुचाकी चोरल्याचं सांगितलं. त्यातील राजेश जाधव हा आमदार लोणीकर यांचा कट्टर समर्थक आणि कार्यकर्ता असल्याचं ही त्याच वेळी समोर आलं.
नक्की वाचा - Nashik Crime : बाकावर बसण्यावरुन वाद; क्लासच्या आवारातच दहावीतील यशराजची निघृण हत्या
पोलिसांनी पुढील कारवाई ही तत्काळ केली. शिवाय त्यांच्या ताब्यातून जवळपास 13 दुचाकी जप्त केल्या आहे. त्यातील आरोपी राजेश जाधव हाच या टोळीचा म्होरक्या होत्या. त्याच्या सांगण्यावरूनच हे कृत्य केलं जात होतं. हे प्रकार समोर आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय मतदार संघातही आमदारांच्या चोर कार्यकर्त्याची चर्चा ही सर्वत्र रंगलेली पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world